साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 29 ऑक्टोबर ते शनिवार 4 नोव्हेंबर 2023

>>नीलिमा प्रधान

मेष- महत्त्वाची कामे करा
मेषेच्या षष्ठेषात शुक्र, बुध, मंगळ युती. महत्त्वाची कामे सप्ताहाच्या सुरुवातीपासून करा. कठोर, कडवट वक्तव्य ऐकावे लागेल. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. गुप्त कारवाया वाढतील. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात भागीदार कुरबुर करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. कायदा पाळा.
शुभ दिनांक : 29, 30

वृषभ- फसगत टाळा
वृषभेच्या पंचमेषात शुक्र, बुध, मंगळ युती. सप्ताहाच्या सुरुवातीला गैरसमज, तणाव, वाद होतील. नोकरीत चूक टाळा. धंद्यात नरमाईची भाषा वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. प्रतिष्ठा जपा. कायदा पाळा. कौटुंबिक प्रश्न सोडवता येतील. व्यवहारात फसगत टाळा. स्पर्धा कठीण आहे.
शुभ दिनांक : 2, 3

मिथुन- अधिकारप्राप्ती होईल
मिथुनेच्या सुखस्थानात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. कोणताही प्रश्न रेंगाळत ठेवू नका. प्रगतीची संधी सोडू नका. दूरदर्शीपणा प्रभावी ठरेल. नोकरीत बढती होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. अधिकारप्र्राप्ती होईल. कौटुंबिक प्रश्नावर मार्ग शोधाल. स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दिनांक : 3, 4

कर्क- प्रवासात सावध रहा
कर्केच्या पराक्रमात शुक्र, बुध मंगळ युती. सप्ताहाच्या मध्यावर शाब्दिक चकमक वाढेल. नोकरीच्या कामात सावध रहा. वाद टाळा. प्रवासात धोका टाळा. धंद्यात गोड बोलून प्रश्न सोडवा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुत्सद्देगिरी उपयुक्त ठरेल. तणाव वाढवू नका. कौटुंबिक कामे वाढतील. परिचयात वाढ.
शुभ दिनांक : 30, 4

सिंह- प्रेरणादायक वातावरण
सिंहेच्या धनेषात शुक्र, बुध, गुरू प्रतियुती. अतिमहत्त्वाची कामे करा. नोकरीत बढती होईल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात प्रेरणादायक वातावरण राहील. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. योजनांना गती येईल. खरेदी-विक्रीत फायदा होईल.
शुभ दिनांक : 31, 1

कन्या- परिचय फायदेशीर
स्वराशीत शुक्र, बुध मंगळ युती. तडफदार, खंबीर नेतृत्वाची झलक दिसेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात नफा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. वरिष्ठ कौतुक करतील. प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाची कामे करा. समस्येवर उपाय मिळेल. लोकप्रियता वाढेल.
शुभ दिनांक: 1, 2

तूळ- ध्येयपूर्तीकडे लक्ष द्या
तुळेच्या व्ययेषात शुक्र, बुध गुरू प्रतियुती. नात्यात, मैत्रीत तणाव राहील. बुद्धिचातुर्याने प्रश्न सोडवा. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत नम्रता ठेवा. कामाचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचयावर फार विश्वास ठेवू नका. ध्येयपूर्तीकडे लक्ष द्या. मन खंबीर ठेवा.

शुभ दिनांक : 3, 4

वृश्चिक- व्यवहारात सावध रहा
वृश्चिकेच्या एकादशात शुक्र, बुध, मंगळ युती. कठोर शब्द वापरण्यापेक्षा कोमल शब्द उपयुक्त ठरतील. कायदा पाळा. प्रवासात क्षुल्लक तणाव होईल. चूक टाळा. धंद्यात व्यवहारात सावध रहा. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे डावपेच सफल होतील. घरगुती कामे वाढतील.
शुभ दिनांक : 31, 4

धनु- प्रगतीची संधी मिळेल
धनुच्या दशमेषात शुक्र, बुध, गुरू प्रतियुती. अस्थिर मनाला स्थिर करा. महत्त्वाची कामे त्वरित करा. भेट, चर्चेत यश मिळेल. नोकरीत धावपळ होईल. प्रगतीची संधी मिळेल. धंद्यात नवा निर्णय घ्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील परिस्थिती समजून घ्या. समस्या सोडवणे कठीण वाटणार नाही. अहंकार नको.
शुभ दिनांक : 2, 3

मकर- अडचणींवर मात कराल
मकरेच्या भाग्येषात शुक्र, चंद्र, बुध प्रतियुती. किरकोळ अडचणींवर मात कराल. भावनाविवश होऊ नका. नोकरीत कर्तव्य पार पाडाल. नवे मित्र मिळतील. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. मुद्दे प्रशंसनीय ठरतील. मोर्चेबांधणीची सुरुवात करा. कौटुंबिक तणाव कमी होईल.
शुभ दिनांक : 31, 4

कुंभ- आरोग्याची काळजी घ्या
कुंभेच्या अष्टमेषात शुक्र, बुध मंगळ युती. दुसऱयांना दोष देण्यात वेळ दवडू नका. पोटाची काळजी घ्या. तुमचा प्रभाव राहील. नोकरीत क्षुल्लक अडचण येईल. धंद्यात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुपित उघड करू नका. प्रतिष्ठा मिळेल. भाषणात प्रभाव वाढेल. कठीण कामे करून घ्या.
शुभ दिनांक : 31, 1

मीन- आत्मविश्वास टिकवा
मीनेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. अतिशयोक्तीपूर्ण बोलणे टाळा. आत्मविश्वास टिकवून ठेवाल. कामावर लक्ष ठेवा. धंद्यात सावध रहा. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विश्वास ठेवू नका. वाद टाळा. वरिष्ठांना दुखवू नका. कौटुंबिक जबाबादारी वाढेल. वृद्धांची चिंता वाटेल.
शुभ दिनांक : 3, 4