आठवड्याचे भविष्य

306

मेष –

पद मिळेल
सूर्य-बुध युती, मंगळ-हर्षल लाभयोग होत आहे. तुमचे डावपेच सर्वांच्या फायद्याचे ठरू शकतात. रविवार आणि सोमवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. प्रकृती सांभाळा. प्रतिष्ठा वाढेल. नोकरी-धंद्यात वर्चस्व वाढेल. पद मिळेल. परदेशी जाण्याची संधी आहे. जबाबबदारी वाढेल.
शुभ दिनांक: 21, 22

वृषभ –

कार्य गतिमान होईल
सूर्य-बुध युती, चंद्र-मंगळ प्रतियुती तुमचे कार्य गतिमान करील. नोकरी-धंद्यात पत मिळेल. मोठे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव, मतभेद दूर करण्याची संधी मिळेल. मंगळवार, बुधवार अचानक खर्च उद्भवतील. कायद्याचे पालन करा. कुटुंबात नाराजी होईल. शुभ दिनांक: 19, 20

मिथुन –

बुद्धीचा कस लागेल
चंद्र-मंगळ प्रतियुती, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. नोकरी, उद्योगधंद्यात तुमच्या बुद्धिचातुर्याचा कस लागेल. अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद विकोपाला जाऊ शकतात. संबंध तुटण्यापर्यंत काही घटना कुटुंबात घडू शकतात. कलाक्षेत्रात तडजोड करण्याची वेळ येईल.
शुभ दिनांक: 21, 22

कर्क –

तुमचे आकर्षण वाढेल
सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. कोणत्याही क्षेत्रातील समस्या याच आठवडय़ात सोडवा. मंगळवार, बुधवार गुप्त कारवाया वाढतील. तुमच्या स्वभावावर टीका होईल. विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. तुमचे आकर्षण वाढेल. नोकरी-उद्योगात जम बसेल. आर्थिक लाभ होईल.
शुभ दिनांक: 19, 20

सिंह –

वाटाघाटीत यश
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहेत. असलेल्या अधिकारांचा उपयोग कसा करायचा याचा नीट विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी जिद्द ठेवा. वाटाघाटीत भरघोस यश मिळवता येईल. कायद्याला कमी समजू नका. शुभ दिनांक: 21, 22

कन्या –

संधी सोडू नका
सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. जवळच्या लोकांना तुमचे महत्त्व कळण्यास वेळ लागेल. नोकरी-धंद्यातील तणाव कमी होऊन मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल ती सोडू नका. जम बसवा. तुमचे वर्चस्व सर्वांना मान्य होईल. गुप्त कारवाया तुमच्या नजरेत भरतील. थकबाकी वसूल करा.
शुभ दिनांक: 19, 20

तूळ –

बोलताना काळजी घ्या
चंद्र-गुरू युती, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. मन अस्थिर करण्याचा प्रयत्न बाहेरून होईल. सावधपणे निर्णय घ्या. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या चुका दाखवून वर्चस्व कमी करण्याचे काम विरोधक करतील. बोलताना काळजी घ्या. व्यवहारात सावध रहा.
शुभ दिनांक: 20, 21

वृश्चिक –

प्रगतीचा नवा टप्पा
चंद्र-गुरू युती, सूर्य-बुध युती होत आहे. नोकरी-धंद्यात येणाऱया अडचणी कमी कराल. खंबीरपणे प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. शक्यता नसलेले लोक मैत्री दाखविण्याचा प्रयत्न करतील. प्रवासात सावध राहा. साडेसाती सुरू आहे. जास्त विश्वास कुणावरही ठेवू नका. स्पर्धेत पुढे रहाल.
शुभ दिनांक: 21, 22

धनु –

वाटाघाटीचा प्रश्न वाढेल
सूर्य-चंद्र षडाष्टक योग आणि चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. नोकरी-धंद्यात समस्या निर्माण होईल. रविवार, सोमवार मतभेद वाढतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न वाढेल. नातलग मदत करतील. वरिष्ठ, विरोधक अडचणी निर्माण करतील. पद देण्यावरून आक्षेप घेतला जाईल. गुप्त कारवाया वाढतील.
शुभ दिनांक: 24, 25

मकर –

कोर्ट केस जिंकाल
सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला विशेष महत्त्व दिले जाईल. दूरदृष्टीने निर्णय घ्या. मंगळवार, बुधवार विरोधाला तोंड देताना वेगळाच प्रहार करण्याची वेळ येईल. प्रगतीची नवी संधी मिळेल. कोर्ट केस जिंकाल. तुमची दहशत वाटेल. कर्तव्य आणि जबाबदारी वाढेल.
शुभ दिनांक: 19, 20

कुंभ –

वरिष्ठांचा दबाव
सूर्य-बुध युती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमचे वक्तव्य वादग्रस्त ठरू शकते. नोकरी-धंद्यात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा दबाव राहील. अतिशयोक्ती न करता डावपेच टाका. खरेदी – विक्रीच्या व्यवहारात काळजी घ्या. नाटय़-चित्रपट क्षेत्रात प्रसिद्धीची प्रतीक्षा करावी लागेल. संततीचा प्रश्न सोडवावा लागेल.
शुभ दिनांक: 20, 21

मीन –

प्रेरणादायी आठवडा
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग आणि सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरी-धंद्यात चांगला बदल होईल. वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार येतील. तुमचे मुद्दे सर्वांना मान्य होतील. चर्चा सफल होईल. आठवडा प्रेरणादायी ठरेल. चिंता कमी होईल.
शुभ दिनांक: 20, 22

आपली प्रतिक्रिया द्या