शुभ वर्तमान


मानसी इनामदार ,ज्योतिषतज्ञ,[email protected]

घरात शांतता, समृद्धी नांदण्यासाठी, वादविवाद टाळण्यासाठी…

तोडगा

सकाळी प्रवेशद्वारापुढील जागा आणि उंबरठा स्वच्छ करून तेथे रांगोळीची शुभ चिन्हे रेखावीत. खूप फरक पडेल.

 मेष…हवे ते घडेल

उत्सवाच्या निमित्ताने बरीच धावपळ झाल्याने प्रकृतीवर ताण पडेल, पण काळजीचे कारण नाही. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यातून आर्थिक फायदा संभवतो. तुम्हाला हवे तसे घडेल. बाप्पाचा आशीर्वाद लाभेल. सोनटक्क्याचे फूल जवळ बाळगा. पांढरा रंग महत्त्वाचा. शुभ आहार…दहीभात, गोड पदार्थ.

वृषभ…जोडीने प्रवास

सत्पात्री मदत जरूर करा, पण अनाहूत सल्ले कोणालाही देऊ नका. कामाशी काम ठेवा. छान प्रवास घडेल. गजाननाच्या सेवेने मनास समाधान लाभेल. जोडीने प्रवास कराल. जोडीदाराबाबत खूप भावनिक व्हाल. सगळे चांगले घडणार आहे. अबोली वस्त्र परिधान करा. शुभ आहार…खव्याचे पदार्थ, घरचे जेवण.

मिथुन…छान बातमी

 शेअर्समध्ये पैसे गुंतवा. निश्चित फायदा होईल. जागरूक रहा. इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. कर्जातून मुक्त व्हाल. बाप्पा काहीतरी छान बातमी देऊन जाईल. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदारासोबत भावबंध दृढ होतील. त्यामुळे खूप सुरक्षित वाटेल. भगवा रंग जवळ ठेवा.शुभ आहार…मोतीचुराचे लाडू, बुंदी.

कर्क…कल्पना प्रत्यक्षात उतरतील

सुखद आठवडा असेच या उत्सवी दिवसांचे वर्णन करावे लागेल. अडकलेल्या कायदेशीर गोष्टी पूर्ण होतील. त्यातून बराच आर्थिक फायदा होईल. स्वकीयांच्या भेटीगाठी होतील. गृहलक्ष्मीवर कामाचा ताण पडेल, पण त्रास होणार नाही. अनेक कल्पना प्रत्यक्षात येतील. वांगी रंग फलदायी.

शुभ आहार…वांग्याची भाजी, भाकरी.

सिंह ः जोडीदाराची साथ

नवीन लोकांशी संपर्कात याल. हा आठवडा तुमची मानसिक ताकद वाढवणारा असेल. तुम्ही मुळातच निडर आहात. तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला या आठवडय़ात फायदा होणार आहे. त्यामुळे घरात परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. जोडीदाराची साथ लाभेल. निळा रंग शुभकारक. शुभ आहार…मक्याचे कणीस, फळे.

कन्या…अनपेक्षित लाभ

महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगा. अनपेक्षित काम निघेल. त्यातून अनपेक्षित लाभही होईल. तुमच्या थट्टेखोर स्वभावामुळे तुम्ही मित्रमंडळीत लोकप्रिय ठराल. उगाच कोणालाही शब्द देऊ नका. वरवर विचार करू नका. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जा. चंदेरी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…खीर, बेसनाचे लाडू.

तूळ…पैसे वाढतील

तुमची व्यक्तिगत माहिती कोणालाही देऊ नका. विशेषतः आर्थिक व्यवहाराविषयी. ते अत्यंत गुप्त ठेवा. त्यामुळे पैसे वाढतील. मोरपीस जवळ बाळगा. घरात शांतता राहील. तेलकट, तिखट आहार टाळा. पिवळा रंग जवळ बाळगा. लहान मुलांची काळजी घ्या.शुभ आहार…घट्ट वरण, पोळी.

वृश्चिक…दक्ष राहा

स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पहा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आर्थिक व्यवहारात अत्यंत दक्ष रहा. बाहेरच्या व्यक्तीवर मुळीच विश्वास नको. अनपेक्षित मिळकत होईल. विनाकारण दडपण घेऊ नका. निळा रंग जवळ ठेवा. शुभ आहार…पुरणपोळी, नारळाचे दूध.

धनु…कौतुकाचा वर्षाव

झटपट पैसा कमावण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या तुम्ही केंद्रस्थानी असाल. त्यामुळे कौतुकाचा वर्षाव होईल. बाप्पा नवे काम मिळवून देईल. त्यातून आर्थिक आवक सुधारेल, पण आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील गणेशाची उपासना करा. बदामी रंग जवळ ठेवा. शुभ आहार…सुका मेवा, बदाम.

मकर…फायदा होईल

ज्ञानात भर पडेल. उगाच चिंता करू नका. आर्थिक अडचणी सुकर होतील. सहनशीलता वाढेल. खेळाडूंनी सरावावर लक्ष द्यावे. पुढे खूप फायदा होणार आहे. कीर्ती वाढेल. बाप्पाची पृपा लाभेल. चार दिवस घरापासून दूर जाल. हिरवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…शेपूची भाजी, भाकरी.

कुंभ…खेळीमेळीचे वातावरण

अति खर्च टाळा. आवक वाढेल. तुमच्यातील मूल जागे होईल. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण तयार कराल. घरापासून लांब राहाल. तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. वरिष्ठ कामावर खुश राहतील. खेळाडूंसाठी चांगला आठवडा. अंजिरी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…अंजीर, काजू.

मीन…स्वतःशी मैत्री

आर्थिक व्यवहार अगदी जपून करा. कोणताही ताण घेऊ नका. सन्मार्गावर नेहमीच काटे असतात, पण तुम्ही त्यातून वाट काढाल. स्वतः स्वतःचे मित्र व्हा. उत्तम वाचन आणि लिखाण घडेल. कामाचे कौतुक होईल. पांढरा रंग जवळ बाळगा. आवडती गोष्ट कराल. शुभ आहार…दूध, मोदक, तूप.