साप्ताहिक राशिभविष्य- 13 एप्रिल ते 19 एप्रिल 2019

4

>> मानसी इनामदार

मेष – आर्थिक आवक
परदेशगमनाचा योग आहे. संधी हातची दवडू नका. घरातील लहानांची मर्जी राखा. त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक आवक वाढेल. शक्य झाल्यास मूळ गावी जाऊन कुलदेवीचे दर्शन घ्या. फायदा होईल. या आठवडय़ात भगवा रंग फलदायी आहे.
शुभ परिधान – पैठणी, गॉगल.

वृषभ – अध्यात्माकडे कल
कर्तृत्ववान, जिगरबाज स्वभावाचे तुम्ही आपल्या मुलांच्या बाबतीत तितकेच हळवे असता. या आठवडय़ात एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. मुलांच्या प्रगतीकडे विशेषतः साथ संगतीकडे लक्ष द्या. प्रवासात लाल रंग अवश्य जवळ बाळगा.
शुभ परिधान – मंगळसूत्र, ब्रेसलेट.

मिथुन – सुट्टीचा आस्वाद
घरातल्या घरात एखादा छोटासा कौटुंबिक समारंभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आप्तस्वकीयांबरोबर सुट्टीचा आस्वाद घ्याल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून रजा त्वरित मंजूर केली जाईल. आमरशी रंग लाभदायक.
शुभ परिधान – खादीचा कुर्ता, स्कार्फ.

कर्क – कुटुंबासमवेत
सुट्टी आपल्या कुटुंबीयांसमवेत घालावा. घरात दुरुस्तीची काही कामे निघतील. घरच्यांचे सहकार्य लाभेल. प्रदीर्घ सुट्टीचा काल लाभेल. घरच्या घरी एखादे देवकार्य करा. मोरपिशी रंग परिधान करा. शक्य झाल्यास सुट्टीच्या कालावधीत शिर्डीला जाऊन या.
शुभ परिधान – ट्रेंडी कपडे, घडय़ाळ.

सिंह – सहलीस जा
अविवाहितांना या सुट्टीतच जोडीदार सापडेल. निळा रंग याबाबत शुभ ठरेल. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. उन्हापासून स्वतःला जपा. थंड हवेच्या ठिकाणी सहलीस जा. कामाच्या ठिकाणी वातावरण शांत राहील. त्याचा फायदा करून घ्या.
शुभ परिधान – रेशमी दुपट्टा, गळ्यात गोफ.

कन्या – नवी खरेदी
उन्हाळ्याची सुट्टी मजेत जाईल. घरात थंड पदार्थ ठेवा. देवाला दही-साखरेचा नैवेद्य दाखवा. हिरवा रंग परिधान करा. घरातील लहानांचे हट्ट पुरवा. त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू आणा. त्यानिमित्ताने नवीन वस्तूची खरेदी होईल.
शुभ परिधान – पाश्चिमात्य पोशाख, ब्रॅण्डेड चप्पल.

तूळ – वाहन खरेदी
मित्रमैत्रिणीच्या भेटीगाठी होतील. जोडीदारासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. ते बेत प्रत्यक्षात आणा. त्यामुळे आपसातील नातेसंबंध सुधारतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. त्यावेळी पिवळा रंग जवळ बाळगा. व्यवसाय उद्योगात जमवून घ्या.
शुभ परिधान – लीननचा ड्रेस, चांदीचे दागिने.

वृश्चिक – मित्र मैत्रिणी
तब्येतीस जपा. तीव्र उन्हात जाणे टाळा. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा योग आहे. मित्रमैत्रिणी संपर्कात येतील. रोजची देवपूजा नियमित करा. त्यावेळी गायत्री मंत्राचा जप करा. तांब्याच्या भांडय़ातून पाणी पिण्याचा नियम ठेवा. मोतिया रंग लाभदायी.
शुभ परिधान – मोत्याची अंगठी, चंदेरी साडी.

धनु – समुद्र प्रवास
गुरूची कृपा या आठवडय़ात तुमच्यावर होईल. घरातील देवीस रोज झेंडूचे फूल वाहा. केशरी रंग लाभदायक. समुद्र प्रवासाचे बेत आखाल. घरापाशी येणाऱया पक्ष्यांना तांदूळ घाला. आर्थिक प्राप्ती वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
शुभ परिधान – सुती रुमाल, स्फटिकाची माळ.

मकर – शुभ कार्य
सुट्टीच्या काळात घरात एखादे शुभ कार्य घडेल. विवाहेच्छुकांसाठी स्थळे सांगून येतील. याच मोसमात विवाह ठरेल. त्यावेळी आकाशी रंग जवळ ठेवा. विवाह यशस्वी ठरेल. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा. हातून नवनिर्मिती घडेल. आहारात पाण्याचे प्रमाण वाढवा.
शुभ परिधान – डिझायनर गाऊन, कुर्ता.

कुंभ – निवांत क्षण
कामानिमित्त सतत बाहेर राहाल. राजकीय क्षेत्रात दबदबा वाढेल. रोजच्या दगदगीतून चार निवांत क्षण मिळतील. ते स्वतःसाठी राखून ठेवा. केवळ आपल्या मनाचे ऐका. कामात यश मिळेल. चांगले साहित्य वाचाल. पिवळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – आवडीचा पोशाख, मोजके अलंकार.

मीन – चांगले परिणाम
कामावर लक्ष केंद्रित कराल. घरात नवीन वस्तूंची अपरिहार्य खरेदी होईल. प्रिय व्यक्ती भेटण्याचा प्रयत्न करेल. अवश्य भेट घ्या. दूरगामी चांगले परिणाम होतील. मन सकारात्मक ठेवा. गुलाबी रंग लाभदायक. साईबाबांची उपासना करा. यश मिळेल.
शुभ परिधान – आधुनिक ड्रेस, कशिदाकारीचा दुपट्टा.

समस्या –
मला सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येईल का? किंवा खासगी ठिकाणी. आणि त्यावर काही उपाय आहे का ?
– स्वप्नील कांबळी
तोडगा-
अर्ज अवश्य करा. दर मंगळवारी शूचिर्भूत होऊन घरातील गणपतीस लाल फुल वाहा.