साप्ताहिक राशिभविष्य 18 मे ते 24 मे 2019

294

>>मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – धार्मिक आठवडा
हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अत्यंत धार्मिक ठरणार आहे एखाद्या जवळच्या तीर्थस्थानाच्या भेटीचा योग येईल. संकष्टी तुमच्यासाठी शुभ ठरेल. लाल रंगासहित गणेशाची उपासना करा. सरकारी कामे पूर्ण होण्यास मदत होईल.
शुभ परिधान – शिफॉनची साडी, कडे

वृषभ – साथ, विश्वास
आपल्या जोडीदाराचा विश्वास आणि साथ ही तुमची सगळ्यात मोठी ताकद ठरणार आहे. शिवपार्वतीचे एकत्रित पूजन करा. संकष्टीला गणपतीला लाल फुल वाहा. निळा रंग परिधान करा. आर्थिक व्यवहारात फसवणूकीची शक्यता.
शुभ परिधान – कॉटनचा कुर्ता, दुपट्टा

मिथुन – नवनिर्मिती घडेल
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करा. यश मिळेल. सर्जनशीलतेला वाव मिळेल. हातून नवनिर्मिती होईल. पांढरा रंग पावित्र्य वाढवेल. घरातील शिवलिंगाला पांढरे फुल वाहा. सोमवारी खिरीचा नैवेद्य देवाला दाखवा.
शुभ परिधान – मलमलचा सदरा, मोती

कर्क – वाहन खरेदी
नवीन नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. नव्या वाहनाच्या खरेदीचा योग आहे. अवश्य खरेदी करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. मोतिया रंग महत्वाचा आहे
शुभ परिधान – रेशमी साडी, मेंदी

सिंह – गुलाबी प्रेम
उद्योगधंद्यात प्रचंड यश मिळेल. सर्वच आघाडीवर यशस्वीतेचा कालखंड आहे. नातेसंबंध सुधारतील. गुलाबी रंग यश देणारा असेल. प्रेमातही गुलाबी रंग भरतील. चांगल्या काळाचा फायदा घ्या. येणारी कोणतीही संधी दवडू नका.
शुभ परिधान – डेनिम, कोल्हापुरी चप्पल

कन्या – उत्तम ग्रहमान
घरात पाहुण्यांचा राबता सुरु होईल. पण गृहलक्ष्मी सगळे निभावून नेईल. निद्रानाशाचा त्रास सुरु होईल. रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हणा. मन शांत होण्यास मदत होईल. ग्रहमान उत्तम आहे. हिरवा रंग शुभकारक
शुभ परिधान – आरामदायी वस्त्र

तूळ – आंब्याचे दिवस
रोज दहा दिवस अंघोळीनंतर गणपतीची पूजा करून त्याला आंब्याचा नैवेद्य दाखवा. घरातील कुरबुरी थांबतील. जोडीदाराची साथ महत्वाची ठरेल. फसवणूक होण्याची शक्यता. आमरशी रंग शुभकारक
शुभ परिधान – ब्रेसलेट, सुती वस्त्र

वृश्चिक – वरकमाई होईल
जवळचा प्रवास घडेल. शक्यतो उन्हात बाहेर पडू नका. सुती कपडे वापरा. काळा रंग परिधान करा. पायांची काळजी घ्या. नोकरांचा त्रास होण्याची शक्यता. सामोपचाराने घ्या. वरकमाई होईल. आकाशी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सैल वस्त्र, सोन्याचे आभूषण

धनु- वातावरण सुधारेल
या आठवडय़ात आर्थिक व्यवहारात चढ उतार संभवतील. खूप पैसे खर्च होतील. सावध राहा. काहीतरी खर्च अचानक उद्भवेल. रामाच्या देवळात जाऊन या. वातावरण सुधारेल. त्यावेळी पिवळा रंग परिधान करा.
शुभ परिधान – पेन, जोडवी

मकर – सकारात्मक ऊर्जा
नोकरी करण्यासाठी चांगला कालखंड. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. घरात संध्याकाळी रोज दिवेलागणीच्या वेळेस धूप लावा. घरात सकारात्मक ऊर्जा येईल. लाल रंग शुभकारक. संकष्टीचा उपास अवश्य करा.
शुभ परिधान – सॅटीनचे वस्त्र, पैंजण

कुंभ – सुंदर नातं
प्रेम खुलण्याचा काल आहे तुमच्या राशीचा. प्रिय व्यक्तीस घेऊन फिरायला जा. घरात अग्नीची पूजा करा. विद्यार्थ्यांनी सुट्टीत आपल्या पुढील अभ्यासाचे नियोजन करावे. नाते दीर्घायुषी ठरेल. केशरी रंग शुभ ठरेल.
शुभ परिधान – केशालंकार, पारंपरिक धोतर

मीन – आर्थिक लाभ
स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक गोष्टी साध्य होतील. सकारात्मक विचार करा. रोज हनुमान चालीसा ऐका. कामाचे कौतुक होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. आर्थिक लाभ होईल. भगवा रंग फलदायी.
शुभ परिधान – सनस्क्रीन क्रीम, चांदीचे अलंकार

समस्या – कित्येक दिवसांपासून नोकरीसाठी प्रयत्न करतेय, अपयशच पदरी येतंय. काय करु? – साक्षी कांबळी.
तोडगा – रोज संध्याकाळी घरातल्या देवासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून मनोभावे नमस्कार करा. तसेच मुलाखतीला जाताना पाच लंवंगा बरोबर ठेवा.

समस्या, प्रश्न, अडचणी मानवी जगण्याचा भाग… थोडी उपायांची दिशा मिळाली की प्रश्नही आपसूकच सुटतात. आपल्या समस्या, प्रश्न ‘bhavishyafulora1234 @gmail.com’ या ईमेल आयडीवर किंवा दै. ‘सामना’च्या पत्त्यावर आपल्या छायाचित्रासह पाठवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या