आठवड्याचे भविष्य


>> मानसी इनामदार (ज्योतिषतज्ञ)

मेष – उत्तम साथ
प्रेमाचा आठवडा असेच येणाऱया दिवसांचे वर्णन करावे लागेल. अविवाहितांचे विवाह जुळतील. महत्वाच्या कामात जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. भावनिक दृष्टया एकमेकांच्या जवळ याल. उर्जेची कमतरता जाणवेल. गुलाबी रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रंगीत खडे, गोफ

वृषभ – मन:सामर्थ्य
अंगभूत कौशल्य आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणीची साथ मोलाची असेल. बाहेरचा प्रवास शक्यतो टाळा. निळा रंग जवळ बाळगा. शनिवारी मारुतीची उपासना करा. त्यामुळे मानसिक सामर्थ्य वाढेल.
शुभ परिधान – ब्रॅण्डेड चप्पल, मधल्या बोटात अंगठी

मिथुन – वरिष्ठांची मर्जी
तुमची कल्पकता आणि नियोजन यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. यातून अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. चमेलीची फुले घरात ठेवा. पांढरा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – चांदीचे दागिने, हिरा

कर्क – लाभ होईल
घरच्यांचा पाठींबा खूप महत्वाचा ठरेल. महत्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. फायदा होईल. लाभदायक फळ देणारा आठवडा. लाल रंग जवळ बाळगा. मनास तेजस्विता प्राप्त करून देईल. अनावश्यक फिरणे टाळा.
शुभ परिधान – फेटा, टोपी

सिंह – अभिमानास्पद काम
एखाद्या मोठया कार्यात तुमचा सहभाग महत्वपूर्ण ठरेल. त्याचा तुमच्या घरच्यांना अभिमान वाटेल. अनावश्यक खर्च टाळा. गणपतीची उपासना करा. भगवा रंग जवळ बाळगा. अनपेक्षित संकटाना सहज मात देऊ शकाल. व्यायामात सातत्य ठेवा.
शुभ परिधान – अबोलीचा गजरा, ब्लेझर

कन्या – सुट्टीचा आनंद
अनेक आनंदी क्षण या आठवडयात तुम्हाला आनंदी करतील. त्यामुळे दिवस मजेत जातील. सुट्टीचा आनंद घ्याल. हातून अनेक कल्पक गोष्टी घडतील. घरच्यांची उत्तम साथ लाभेल. आवडीच्या ठिकाणी फिरायला जाल.. हिरवा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – सुती साडी, कुर्ता

तूळ – केंद्रस्थानी असाल
घरातील काही गोष्टींमुळे मनास अस्वस्थता येईल. पण काळजी करू नका. आपसूक गोष्टी मार्गी लागतील. तुमची बुद्धिमत्ता कामास येईल. त्यामुळे तुम्ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी असाल. मन अत्यंत कणखर ठेवावे लागेल. मरून रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – सनस्क्रीन, सोन्याची बांगडी

वृश्चिक – विशेष लाभ
लाभ दायक आठवडा,. सरकारी कर्मचाऱयांना कामाच्या ठिकाणी लाभ होईल. विशेषतः लष्करी अधिकारी. त्यांच्या कामाची खूप प्रशंसा केली जाईल. त्यामुळे घरातही उत्साहाचे वातावरण राहील. आप्त स्वकीयांच्या भेटी होतील. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – ऍमेथिस्ट खडा, तांब्याचे कडे

धनु – खर्च कराल
कामाच्या ठिकाणी उगाच तणावाचे प्रसंग निर्माण होतील. पण तुमच्यापर्यंत काही येणार नाही. तुम्हीही अलिप्त राहा. आवडत्या व्यक्तीशी भेट होईल. अर्थ प्राप्ती होईल. त्यामुळे खर्च करावासा वाटेल. अबोली रंग महत्वाचा.
शुभ परिधान – जोडवी, घडयाळ

मकर – गप्पा होतील
नियमित व्यायाम आणि आहारातील संतुलन महत्वाचे ठरेल. जन्मगावी जाण्याची संधी येईल. ती गमावू नका. त्यामुळे मनास समाधान मिळेल. नव्या व्यक्ती भेटतील. गप्पा होतील. ज्ञानात भर पडेल. आकाशी रंग जवळ बाळगा. शुभ परिधान – शर्ट, झब्बा

कुंभ – पत्नीची काळजी
महत्वाचे व्यावसायिक निर्णय जपून घ्या. मोठे आर्थिक व्यवहार कराल. पण त्यात डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. कायदा पाळा. कामानिमित्त बाहेर जाल. पत्नीची काळजी घ्या. तिला वेळ द्या. काळा रंग जवळ बाळगा. शिव उपासना करा.
शुभ परिधान – आरामदायी पोशाख

मीन – मेहनतीचे फळ
जीवतोड केलेली मेहनत कामी येईल. केलेल्या कामाबद्दल पारितोषिक मिळेल. खेळाडूंनी असंतुष्ट असावे. मेहनतीत कसूर नको. हिरवा रंग जवळ बाळगा. बाहेरील आहार टाळा. घरातील व्यक्तींशी भावनिक बंध दृढ होतील.
शुभ परिधान – वेगवेगळ्या अंगठया.

[email protected]