आठवड्याचे भविष्य – १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट

>> नीलिमा प्रधान

मेष – कामासाठी धावपळ
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार कुटुंबातील कामासाठी धावपळ होईल. जीवनसाथीबरोबर किरकोळ मतभेद होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अधिक नव्या पद्धतीने योजना तयार करता येतील. सर्वांना एकत्र करण्यात यश मिळेल. विरोधक मैत्री करतील,
शुभ दिनांक – 21, 22.

वृषभ – दर्जेदार लोकांचा सहवास
चंद्र-मंगळ युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दर्जेदार लोकांच्या सहवासात राहाल. विरोधक तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात मोठे काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. पैसे गुंतवून कोणतेही काम करून घेता येईल असे समजू नका.
शुभ दिनांक – 19, 20.

मिथुन – वाद आणि तणाव
चंद्र, मंगळ युती, सूर्य-हर्षल त्रिकोणयोग होत आहेश्. या आठवडय़ात कुटुंबात वाद व तणावाचे प्रसंग येतील. वाटाघाटीत असंतोष वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्हाला दिशाहीन करण्याचा प्रयत्न होईल. परंतु तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती-बदलीची शक्यता आहे. प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 21, 22.

कर्क – कामे वेगात पूर्ण होतील
सूर्य-हर्षल त्रिकोण- योग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. रेंगाळत राहिलेली कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. राजकीय-सामाजिक क्षेत्रात दरारा वाढेल. तुमची दूरदृष्टी वरिष्ठांना आवडेल. व्यवसायातील समस्या कमी होऊ शकेल. विरोधकांना गप्प करण्याची संधी मिळेल. बुद्धिचातुर्य वापरा.
शुभ दिनांक – 24, 25.

सिंह – अहंकार दिसू देऊ नका
सूर्य-हर्षल त्रिकोणयोग, बुध-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा हेतू चांगला असला तरी त्याबद्दल ठाम निर्णय घ्यावा लागेल. गुप्त शत्रू काडय़ा घालून वातावरण तुमच्या विरोधात निर्माण करतील. अहंकार दिसू देऊ नका. बोलण्याचा सूर बदलावा लागेल.
शुभ दिनांक – 21, 22.

कन्या – मोठेपणाची धुंदी नको
चंद्र-गुरू लाभयोग, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. परिस्थिती हाताबाहेर न जाता कार्य करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मोठेपणा देत कठीण प्रश्न सोडवण्याची जबाबदारी येईल. शेअर्समध्ये लाभ. मोठय़ा लोकांकडून आश्वासन मिळेल. मोठेपणाच्या धुंदीत राहू नका.
शुभ दिनांक – 19, 24.

तूळ – योजना मार्गी लागतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. तुमच्या स्पष्ट व धडाकेबाज कार्याचा, बोलण्याचा प्रभाव सर्वच ठिकाणी वाढेल. कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना मात्र दुखवू नका. . राजकीय-सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांच्या विचाराने सहवासाने प्रेरित व्हाल. कठीण काम मार्गी लावता येईल.
शुभ दिनांक – 20, 21.

वृश्चिक- समस्यांतून सुटका होईल
चंद्र-बुध प्रतियुती, सूर्य-शनि त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायातील अंदाज बरोबर येईल. विरोधकांना आपलेसे करण्यात यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. कठीण समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात आत्मविश्वास वाढेल. नवीन परिचय होतील.
शुभ दिनांक – 21, 22.

धनु – चौफेर यश लाभेल
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. तुमच्या बोलण्याचा विरोधकांवर परिणाम होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रत्येक दिवस चौफेर यशाचा ठरेल. लोकांच्या व्यथा समजून घ्या. मोठय़ा लोकांचा सहवास मिळेल. व्यवसायात सुधारणा करण्याची संधी मिळेल.वाटाघाटीचा प्रश्न निकालात काढता येईल.
शुभ दिनांक – 24, 25.

मकर – सावधगिरी बाळगा
सूर्य-मंगळ षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. तुमचे कोणाबद्दलही स्पष्ट मत मांडणे फारच धाडसाचे ठरेल. गुप्त गोष्टी समजतील. त्याचा गौप्यस्फोट केल्यास तुमच्याबद्दल इतरांना राग निर्माण होईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळेल, स्वतःकडून चूक होणार नाही याची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 24, 25.

कुंभ – गैरसमज दूर होतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, शुक्र-नेपच्यून षडाष्टक योग होत आहे. जवळच्या व्यक्तीपासून मनस्ताप संभवतो. विश्वासघात करणारी घटना घडेल. राग वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करू शकाल. बोलण्यातून झालेला गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. प्रवासात सावध रहा.
शुभ दिनांक – 20, 21.

मीन – अहंकाराला दूर ठेवा
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना तुमच्याबद्दल वाईट गोष्टी सांगण्याचा प्रयत्न होईल. मात्र नम्र राहा. अहंकाराने अडचणी वाढू शकतात. व्यवसायात मन स्थिर ठेवा. मोठे स्वरूप देण्यापेक्षा आहे तसेच काम चालू ठेवा.
शुभ दिनांक – 19, 20.