आठवड्याचे भविष्य – 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2018

>> नीलिमा प्रधान

मेष – चौफेर प्रगती होईल
मेषेच्या पंचमेषात बुध प्रवेश, बुध-शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वेगाने चौफेर प्रगतीचा घोडा पळवता येईल. डावपेच यशस्वी होतील. दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रांत बाजी माराल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. शुभ दिनांक – 2, 3.

वृषभ – सावध राहा
वृषभेच्या चतुर्थात बुध प्रवेश, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. तुमचा आत्मविश्वासच सर्वात महत्त्वाचा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या विरोधात पण अपरोक्षपणे काही हालचाली होतील. लक्ष ठेवा. नोकरीत मेहनत घ्या. मर्जी राखा. कला, क्रीडा क्षेत्रांत कामाचा वेग कमी पडू शकतो.
शुभ दिनांक – 4, 5

मिथुन – वर्चस्व प्रभावी ठरेल
मिथुनेच्या पराक्रमात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. सामाजिक क्षेत्रात सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त करा. दुखापत संभवते. राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रभावी ठरेल. पदाधिकार मिळेल. योजनांना योग्य प्रकारे मार्गी लावा. व्यवसायाला मोठे स्वरूप प्राप्त होईल. नोकरीत बदल करता येईल.
शुभ दिनांक – 4, 6.

कर्क – गैरसमज दूर होतील
कर्केच्या धनेषात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. परिचयातून मोठे काम मिळू शकेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत कार्य करण्यासाठी लोकांची मदत मिळेल. वरिष्ठांच्या मनात आदराची भावना वाढेल. कुटुंबातील गैरसमज दूर होतील.
शुभ दिनांक – 2, 3.

सिंह – धाडसी निर्णय घ्याल
स्वराशीत बुधाचे राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत धाडसी निर्णय घेता येईल. तुमचे वर्चस्व चौफेर सिद्ध करू शकाल. जनतेचे प्रेम मिळेल. व्यवसायात सुधारणा करून मोठे काम मिळवण्यात यश मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल.
शुभ दिनांक – 2, 4.

कन्या – अहंकार दूर ठेवा
कन्या राशीच्या व्ययेषात बुध प्रवेश, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमचे स्थान कमपुवत ठरवले जाईल. या सर्वांवर मात करण्याची तयारी ठेवा. अहंकाराने दूर ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रांत यश मिळेल. शुभ दिनांक – 2, 3.

तूळ – प्रतिष्ठा वाढेल
तूळेच्या एकादशात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभ योग होत आहे. मनस्ताप होईल. दुखापत संभवते. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या बुद्धीची चमक डोळय़ात भरेल. प्रतिष्ठा वाढेल, लोकप्रियता वाढेल. व्यवसायात वाढ होईल. कला, क्रीडा क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. नवे काम मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
शुभ दिनांक – 4, 5.

वृश्चिक – भावनांची गल्लत नको
वृश्चिकेच्या दशमेषात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभ योग होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. व्यवसायात सप्ताहाच्या मध्यावर तुमचा अंदाज चुकेल. व्यवहार व भावना यांचा योग्य मेळ घाला. गरजूंना त्याचा लाभ होईल हे पाहा. कला, क्रीडा क्षेत्रांत प्रगती होईल. कोर्टात बेसावध राहू नका.
शुभ दिनांक – 6, 7.

धनु – योजना मार्गी लागतील
धनुच्या भाग्येषात बुध प्रवेश, बुध-शुक्र लाभ योग होत आहे. साडेसातीचे मधले पर्व सुरू आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या योजना मार्गी लावता येतील. अडचणींवर मात करावी लागेल. व्यवसायात खर्च वाढेल. भीडस्तपणा न ठेवता तुमची कामे करून घ्या. नावलौकिक मिळेल. सहाय्य मिळेल. शुभ दिनांक – 4, 5.

मकर – सावध राहा
मकरेच्या अष्टमेषात बुध प्रवेश, चंद्र-गुरू त्रिकोण योग होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत पेचप्रसंग निर्माण होतील. तुमच्या प्रतिष्ठेवर टीका केली जाईल. जनतेचे प्रेम संपादन करण्यात पुढे राहाल. कोर्ट केससंबंधी कामात सावध भूमिका घ्या. नोकरीत दुसऱ्यांचे काम करण्याची वेळ येईल.
शुभ दिनांक – 6, 7.

कुंभ – संयम राखा
कुंभेच्या सप्तमेषात बुध प्रवेश, चंद्र-शुक्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अभ्यासपूर्ण योजनांची मांडणी करा. गुप्त कारवाया करणारे लोक काडय़ा घालण्याचा प्रयत्न करतील. वाहनापासून धोका व खर्च निर्माण होईल. कुटुंबात सुखद घटना घडेल. मनावर एखादे दडपण आहे असे वाटेल. शुभ दिनांक – 4, 5.

मीन – निर्णयात सावधगिरी बाळगा
मीन राशीच्या षष्ठ स्थानात बुध प्रवेश, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. ग्रहांची साथ कमी आहे. तुमचे मानसिक सामर्थ्यच मात्र तुम्हाला कठीण प्रसंगातून मार्ग दाखवणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. व्यवसायात स्पर्धा वाढेल. मदतीची जास्त अपेक्षा ठेवू नका. शुभ दिनांक – 4, 5..