साप्ताहिक राशिभविष्य- रविवार 3 ते शनिवार 9 फेब्रुवारी 2019

7

>> नीलिमा प्रधान

मेष – अडचणींतून मार्ग काढाल
स्वराशीत मंगळ, मेषेच्या एकादशात बुध राश्यांतर म्हणजे आत्मविश्वासात भर पडेल. बुद्धिचातुर्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात अडचणींतून मार्ग काढता येईल. संघर्ष संपलेला नाही, परंतु तुमची नवीन खेळी महत्त्वाची ठरेल. दौऱ्यात यश मिळेल.
शुभ दिनांक – 5, 6.

वृषभ – निर्णयात सावधगिरी बाळगा
वृषभेच्या व्ययेषात मंगळ, दशमेषात बुध प्रवेश. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मेहनत केल्याचे समाधान मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. संयमी वृत्ती नेहमीच सावधपणे निर्णय घेण्यास उपयोगी पडते. कुटुंबात चांगला बदल होईल. घर, वाहन खरेदी कराल. तुमची मदत इतरांना फार अभिमानास्पद वाटेल.
शुभ दिनांक – 3, 4.

मिथुन – प्रेरणादायी घटना घडतील
मिथुनेच्या एकादशात मंगळ, भाग्यात बुधाचे राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मिळते-जुळते धोरण ठेवून इतरांचे मत ऐकून घ्या. जवळचे लोक मदत करतील. नाट्य-चित्रपट, साहित्यात प्रेरणादाची घटना घडेल. नवीन परिचय कार्याला दिशा देणारा ठरेल. वरिष्ठांचा दबाव राहील.
शुभ दिनांक – 6, 7.

कर्क – महत्त्वाचा निर्णय घ्याल
कर्केच्या दशमेषात मंगळ, अष्टमेषात बुध राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय याच आठवडय़ात घ्या. व्यवसायात उतावळेपणाने पैसे गुंतवू नका. वाटाघाटीत एकमेकांत गैरसमज होईल. करार करताना योग्य सल्ला घ्या. कलाक्षेत्रात थोरांकडून आश्वासन मिळेल.
शुभ दिनांक – 3, 4.

सिंह – व्यवसायात सुधारणा होईल
सिंहेच्या भाग्यात मंगळ, सप्तमेषात बुधाचे राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चढ-उतार होईल. लोकांचे प्रेम तुम्हाला उत्साह देणारे ठरेल. व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामात सावध रहा. जास्त अपेक्षा ठेवू नका. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील.
शुभ दिनांक – 6, 7.

कन्या – प्रभावी मत मांडाल
कन्येच्या अष्टमेषात मंगळ, षष्ठेषात बुधाचे राश्यांतर होत आहे. व्यवसायात समस्या येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी असले तरी तणाव व मतभेद होईल. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्या. नाटय़-चित्रपट, साहित्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या क्षेत्रात यश खेचून आणावे लागेल. शुभ दिनांक – 3, 4.

तूळ – जिद्द कायम ठेवा
तुळेच्या सप्तमेषात मंगळ, पंचमेषात बुध राश्यांतर होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एखादा बदल तुम्हाला न पटणारा असू शकतो. तुमची जिद्द मात्र सोडू नका. नाटय़-चित्रपट, साहित्यात प्रगतीची संधी मिळेल. निर्णय घेण्याची वेळ येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.
शुभ दिनांक – 6, 7.

वृश्चिक – प्रयत्नांचा वेग वाढवा
वृश्चिकेच्या षष्ठेशात मंगळ, सुखेषात बुधाचे राश्यांतर होत आहे. व्यवसायाला कलाटणी देता येईल. प्रयत्नांचा वेग वाढवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात एकीचे बळ प्रबळ करण्यात यश येईल. स्पर्धा सोपी नसेल. नाटय़-चित्रपट, साहित्यात प्रभाव दिसेल. क्रीडा क्षेत्रात विरोधक मैत्री करतील.
शुभ दिनांक – 4, 5.

धनु – प्रगतीकारक आठवडा
धनु राशीच्या पंचमेषात मंगळ, पराक्रमात बुधाचे राश्यांतर होत आहे. प्रत्येक दिवस प्रगतीचा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. योजनांना योग्य न्याय देता येईल. लोकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधता येईल. व्यवसायात वाढ करता येईल. नाटय़-चित्रपट, साहित्यात नवे काम मिळेल.
शुभ दिनांक – 3, 4.

मकर – वर्चस्व वाढेल
मकरेच्या सुखस्थानात मंगळ, धनेषात बुधाचे राश्यांतर होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमचे वर्चस्व वाढेल. कामात यश मिळेल. कुटुंबात क्षुल्लक गैरसमज होईल. व्यवसायात प्रगतीचा नवा फंडा हाती घेता येईल. स्पष्ट बोलणाऱया व्यक्तीच्याही मतांचा जरूर विचार करा. प्रेरणा मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.
शुभ दिनांक – 6, 7.

कुंभ – आर्थिक लाभ होतील
कुंभेच्या पराक्रमात, मंगळ, स्वराशीत बुध राश्यांतर होत आहे. समस्या प्रेमाने सोडवा. दादागिरीने गुप्त शत्रू वाढू शकतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा आढावा घेऊनच तुमचे मत व्यक्त करा. निरीक्षणातून सुद्धा माणसाला नवी प्रेरणा मिळते. नवा परिचय होईल. आर्थिक लाभ होईल.
शुभ दिनांक – 8, 9.

मीन – प्रतिमा उंचावेल
मीनेच्या धनेषात मंगळ, व्ययेषात बुध प्रवेश करीत आहे. व्यवहार करताना आर्थिक धोरणात कमी राहू शकते याचे भान ठेवा. यांत्रिक बिघाडासाठी खर्च होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिमा उजळेल. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रगती होईल.
शुभ दिनांक – 3, 4.