आठवड्याचे भविष्य : रविवार 9 ते शनिवार 15 जून 2019

129

>> नीलिमा प्रधान

मेष : जिद्द ठेवा
मिथुनेत सूर्यप्रवेश, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसाय-नोकरीत क्षुल्लक तणाव दूर करण्याची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवे गुंतवणूकदार मिळतील. सर्व सोपे समजू नका. जिद्द ठेवा. मंगळवार, बुधवार विरोध होईल. प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.
शुभ दिनांक – 9, 13

वृषभ : स्पर्धेत जिंकाल
मिथुन राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. डोळय़ांची काळजी घ्या. गुरुवार-शुक्रवार धंद्यात खर्च निर्माण होईल. घर, वाहन खरेदी कराल. कौटुंबिक तणाव कमी होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. शुभ दिनांक – 10, 11

मिथुन : वाद वाढवू नका
स्वराशीत सूर्याचे राश्यांतर, मंगळ-गुरू षडाष्टक योग होत आहे. उद्योगधंद्यात नवी संधी मिळेल. नोकरीत कामाचा व्याप राहील. प्रतिष्ठsसंबंधी चिंता वाटेल. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. मैत्रीत दुरावा येईल. वाद वाढवू नका. कुटुंबात नाराजी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनावर दडपण येईल. शुभ दिनांक – 14, 15

कर्क : वेळेचे भान ठेवा
मिथुनेत सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर कामे करता येतील. अतिशयोक्तीने कुठेही वावरू नका. व्यक्त होताना प्रसंग, वेळेचे भान ठेवा. कायदा पाळा. वाहनापासून धोका होईल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अन्याय होत आहे असे वाटेल.
शुभ दिनांक – 9, 11

सिंह : पदाधिकार मिळेल
मिथुन राशीत सूर्य राश्यांतर आणि सूर्य-गुरू प्रतियुती होत आहे. नोकरी मिळेल, पण ती टिकवा. व्यवसायास दिशा मिळेल. नवीन कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न करा. घरासंबंधीची चिंता मिटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार मिळण्याची आशा निर्माण होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. शुभ दिनांक – 11, 13

कन्या : प्रेमाला चालना
मिथुन राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. कौटुंबिक जबाबदारी कुशलतेने पूर्ण कराल. रविवार, सोमवार वाद वाढवू नका. वाहन जपून चालवा. तुमचे सहाय्य घेण्यासाठी विरोधक, मित्रपक्ष येतील. कोर्टाचे काम संपवा. प्रेमाला चालना मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दिनांक – 13, 14

तूळ : संयम ठेवा
मिथुन राशीत सूर्य राश्यांतर आणि चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. संयम ठेवा, धंद्यात दूरदृष्टी ठेवा. गिऱहाईकाबरोबर नम्र रहा. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक करू नका. पदासाठी वाट पाहावी लागेल. मैत्रीत, कुटुंबात नमते धोरण ठेवा.
शुभ दिनांक – 14, 15

वृश्चिक : मित्रपक्ष उपयोगी पडेल
मिथुनेत सूर्यप्रवेश आणि सूर्य-शनी षडाष्टक योग होत आहे. उद्योगधंद्यात मोठे काम मिळेल, परंतु नीट पारखून घ्या. यांत्रिक बिघाडामुळे काम वेळेवर होणे कठीण होईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. विरोधक चहुबाजूंनी हल्ले करतील. मित्रपक्ष उपयोगी पडेल. प्रवासात सावध रहा. शुभ दिनांक – 10, 15

धनु : मैत्रीत दुरावा
मिथुनेत सूर्य राश्यांतर, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. कुठल्याही क्षेत्रात सुरुवातीच्या चर्चेत नमते धोरण ठेवावे लागेल. मनोबल टिकून राहील. नोकरीत सहकारी त्रास देतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कटकारस्थाने होतील. तुमच्यावर आरोप, टीका यांचा भडिमार होईल. मैत्रीत दुरावा संभवतो. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 13, 14

मकर : संमिश्र आठवडा
मिथुनेत सूर्यप्रवेश, मंगळ-गुरू षडाष्टक योग होत आहे. आठवडय़ाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करा. धंद्यात निश्चित धोरण ठरवताना काळजी घ्या. योग्य व्यक्ती आणि मित्रांचा सल्ला घ्या. ध्येयावर लक्ष ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. आठवडा संमिश्र असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिंकाल, प्रगती कराल.
शुभ दिनांक – 11, 12

कुंभ : मनावर दडपण येईल
मिथुन राशीत सूर्याचे राश्यांतर, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. प्रगतीचा किनारा थोडा दूर दिसेल. व्यवसायात प्रगती होईल. मंगळवार, बुधवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढेल. मनावर दडपण येईल. आठवडय़ाच्या शेवटी दिशा मिळेल. शुभ समाचार प्राप्त होईल. प्रेमाने काम करून घ्या. व्यवहारात सावध रहा.
शुभ दिनांक – 14, 15

मीन : दुखापत संभवते
मिथुनेत सूर्य प्रवेश करीत आहे. चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात मोठे काम मिळेल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. गोड बोलून हेतू साध्य करा. नोकरीत वरिष्ठ तुमची बाजू घेतील. मनाची अस्थिरता राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. आठवडा दगदगीचा राहील. शुभ दिनांक – 11, 15

आपली प्रतिक्रिया द्या