आठवड्याचे भविष्य – 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2018

18

>> नीलिमा प्रधान

मेष – उत्साहावर नियंत्रण ठेवा
चंद्र-बुध प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक, कुटुंबातील व्यक्तींचा मानसिक दबाव तुमच्यावर राहील. रागावर व अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. व्यवसायामध्ये लक्ष द्या. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत कौतुक होईल. शुभ दि. – 23, 24

वृषभ – योजना गतिमान होतील
शुक्र-गुरू युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. तुमचा उत्साह व आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवी प्रेरणा देईल. व्यवसायातील समस्या संपवता येतील. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील गैरसमज दूर करता येतील. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. योजना गतिमान होईल. शुभ दि. – 21, 22

मिथुन – व्यवसायात सावध रहा
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, मंगळ-गुरू त्रिकोणयोग होत आहे. मनौधैर्य टिकून राहील. त्यामुळे कोणताही प्रसंग निभावून नेता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुम्हाला मिळालेल्या अधिकारासंबंधी कुजबूज होईल. प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होईल. व्यवसायातील मोठे काम घेताना सावध रहा. शुभ दि. ः 22, 24

कर्क – मानसन्मान वाढेल
शुक्र-गुरू युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. ताण-तणावातून बाहेर पडता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर झालेला अन्याय दूर करू शकाल. वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करता येईल. मान-सन्मान वाढेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत अविस्मरणीय कार्य होईल. सुखद समाचार मिळेल. शुभ दि. – 23, 24

सिंह – प्रकृतीकडे लक्ष द्या
सूर्य-चंद्र षडाष्टक योग, मंगळ-गुरू त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला समस्या येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील तुमचे महत्त्व पाहून हितशत्रू अडचणी आणतील. तुमच्या जवळच्या लोकांना स्वतःच्या जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रवासात सावध रहा. शुभ दि. – 25, 26

कन्या – अडथळे कमी होतील
शुक्र-गुरू युती, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. तुमच्या कामातील अडथळे कमी झाल्याने आत्मविश्वास वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेतेमंडळी तुमच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतील. कोणत्या पद्धतीचे डावपेच टाकायचे ते ठरवता येईल. नवीन वास्तू, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दि. ः 20, 21

तूळ – मनाची अस्थिरता वाढेल
शुक्र-गुरू युती, चंद्र-बुध त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत कामाचे वेळापत्रक बदलण्याची वेळ येईल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा लागेल. तुमचे मन अस्थिर होईल. व्यवसायात संधीचा फायदा घ्या. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत मेहनत कमी पडेल. यश हुकण्याची शक्यता. शुभ दि. – 22, 23

वृश्चिक – आत्मविश्वास वाढेल
शुक्र-गुरू युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग तुमच्या प्रत्येक कार्यात यश देणारा ठरेल. विरोध करणारे लोक तुमच्या बोलण्याचा विचार व्यवसायात करतील. नव्याने संबंध प्रस्थापित करता येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वास निर्माण होईल. जीवनाला कलाटणी मिळेल. शुभ दि. – 21, 22

धनु – कामे मार्गी लागतील
सूर्य-चंद्र, त्रिकोणयोग, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. या आठवडय़ात तुमची कठीण कामे मार्गी लावता येतील. कुटुंबात जवळच्या व्यक्तीबद्दल चिंताजनक घटना घडण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील मतभेद चर्चेअंती मिटवता येतील. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. खर्च वाढेल. शुभ दि. – 23, 24

मकर – शेअर्समध्ये लाभ
चंद्र-मंगळ त्रिकोणयोग, शुक्र-गुरू युती होत आहे. नोकरीधंद्यातील बिघडलेली घडी नीट बसवता येईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. झंझावाती कार्य पाहून गुप्त हितचिंतक कारवाया करण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रगतीवर फारसा परिणाम होणार नाही. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक होईल. शुभ दि. – 25, 26

कुंभ – ताणतणाव वाढेल
चंद्र-बुध प्रतियुती, शुक्र-गुरू युती होत आहे. या आठवडय़ात प्रत्येक कामात अडचणी येतील. त्यावर मात करता येईल. व्यवसायात अचानक यांत्रिक बिघाड होऊ शकतो. राजकीय-सामाजिक क्षेत्रात ताणतणाव होईल. थोरामोठय़ांचे दडपण राहील. गुप्त कारवायांवर लक्ष असू द्या. कलाक्षेत्रांत प्रसिद्धीसाठी विलंब होईल. शुभ दि.- 23, 24

मीन – रागावर नियंत्रण ठेवा
चंद्र-शुक्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. ठरविलेला कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण करू शकाल. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत चर्चा यशस्वी होईल. दौऱयात प्रभाव वाढेल. लोकप्रियता व प्रसिद्धी मिळेल. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. व्यवसायात प्रगती होईल. शुभ दि. – 25, 26