आठवड्याचे भविष्य

100

>> मानसी इनामदार

मेष – पाठिंबा मिळेल
कामाच्या बाबतीत या आठवडय़ात तुमचा कस लागणार आहे. अत्यंत संयम बाळगण्याची जरूर आहे. कोणत्याही वादात सापडू नका. घरातील लहानांचे हट्ट पुरवा. त्यांच्यासाठी वेळ काढा. भगवा रंग परिधान करा. घरातील वातावरण तुम्हाला पाठिंबा देणारे असेल.

शुभ परिधान – पायघोळ वस्त्र, चांदीचा अलंकार

वृषभ – जनसंपर्काचा उपयोग
घरातील तुळशीला रोज पाणी घालण्याचा नेम ठेवा. मनोकामना पूर्ण होतील. हिरवा रंग परिधान करा. कुटुंबातील वादविवाद तुमच्या मध्यस्थीने मिटतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल. दानधर्म करा. मुलाची शिक्षणात प्रगती होईल.
शुभ परिधान – नऊवारी साडी, कोट.

मिथुन – स्वप्न साकार
स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. मेहनतीत कसूर नको. अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार होईल. खरेदी करताना सावधानता बाळगा. जोडीदाराचा सल्ला अवश्य विचारात घ्या. नवीन वास्तू अत्यंत फलदायी ठरेल. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – रेशमी अंगरखा, आवडते दागिने.

कर्क – उत्तम ग्रहमान
एखादी लहानशी शस्त्रक्रिया होईल. त्यानंतर प्रकृतीच्या काही तक्रारी राहणार नाहीत. भागीदारीत पैसे गुंतवा. कायदेविषयक कामे यशस्वी होतील. देवघरात लक्ष्मीची प्रतिमा असलेले चांदीचे नाणे प्रस्थापित करा. रोज पूजा करा. लाल रंग महत्त्वाचा.
शुभ परिधान – मोती, नेलपेंट.

सिंह – भरपूर टीका
विद्यार्थी वर्गास अतिशय चांगला आठवडा आहे. अगदी थोडे का होईना, घरात सोन्याची खरेदी करून ठेवा. त्या वेळी पीत वस्त्र धारण करा. सोने तिजोरीत ठेवा. लक्ष्मीचा वास राहील. पोटाच्या विकारांपासून सावध राहा.
शुभ परिधान – पैठणी, चंदन.

कन्या – चांगले वातावरण
पांढरा रंग फलदायी. दररोज घरातील शिवलिंगाला पांढरे फुल वाहा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी लाभेल. त्यांना दुखवू नका. बढतीचे योग आहेत. कर्तव्यात कसूर नको. वातावरण चांगले आणि अर्थपूर्ण राहील.
शुभ परिधान – सुती कुर्ता, पाचू

तूळ – पतीची साथ
भावंडांना तुमच्याकडून मोलाची मदत मिळेल. कौटुंबिक सहलीचे आयोजन होईल. गणेशाची उपासना सुरू ठेवा. पतीला कामात यश मिळेल. निळा रंग महत्त्वाचा ठरेल. व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.
शुभ परिधान – पंजाबी ड्रेस, उपवस्त्र

वृश्चिक – नवनिर्मिती कराल
कलावंतांना आठवडा फार चांगला जाईल. हातून उत्तम कला निर्मिती होईल. गोड पदार्थ टाळा. स्वकीयांसोबत वेळ चांगला जाईल. बाळकृष्णाला तुळस वाहा. स्वतःही तुलसीचे सेवन करा. राखाडी रंग जवळ बाळगा. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
शुभ परिधान – हातात बांगडी, चमेलीचा गजरा

धनु – मन रमेल
हाती आलेली संधी दवडू नका. केशरी रंग जवळ बाळगा. घराबाहेर पडताना नेहमी उजवे पाऊल आधी घराबाहेर ठेवा. ज्या कामासाठी जाल त्यात यश मिळेल. कार्यालयीन वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.
शुभ परिधान – सौंदर्य प्रसाधन, सुगंध

मकर – प्रेम करा
किमती वस्तूंची खरेदी होईल. पिवळा रंग जवळ बाळगा. नेकी कर दर्या मे दाल हे तत्त्व ठेवा. तरुणांना प्रेमात यश मिळेल. हवाबदलाचा त्रास संभवतो. घरातील लहानांची प्रगती होईल. त्यामुळे मन आनंदी राहील. स्थावर लाभ होतील.
शुभ परिधान – मेंदी, रुद्राक्ष

कुंभ – प्रसिद्धी, यश
आर्थिक लाभ भरपूर होतील. पण मदत करताना पैसे खूप खर्च होतील. प्रसिद्धी आणि यश दोन्ही गोष्टी प्रसन्न आहेत. आपले हितशत्रू ओळखा. घरात विवाह योग आहेत. लाल रंग जवळ बाळगा. संत सज्जनांची उपासना करा.
शुभ परिधान – तुळशीची माळ, माणिक खडा धोतर

मीन – अनुकूलतेकडे वाटचाल
निळा रंग महत्त्वाचा आहे. व्यवसाय, उद्योगात यश मिळेल. स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान. नवीन नाते निर्माण होईल. विठोबा-रखुमाईचे दर्शन घ्या. घरात तुळशीचे रोप स्वहस्ते लावा.
शुभ परिधान – मोगरा, चाफ्याचा सुवास

आपली प्रतिक्रिया द्या