आठवड्याचे भविष्य : 26 मे ते 1 जून 2019

189

>> नीलिमा प्रधान 

मेष – प्रगतीचा मार्ग लाभेल
मेषेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून लाभयोग होत आहे. नोकरी, व्यवसायातील तणाव कमी होईल. प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आत्मविश्वासानेच सर्वांना एकत्र करू शकाल. प्रतिष्ठा वाढेल. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. शुभ दिनांक – 26, 27

वृषभ – तणाव कमी होतील
वृषभेच्या धनेषात बुध राश्यांतर, शुक्र-शनी त्रिकोणयोग होत आहे. नोकरीतील तणाव कमी होईल. व्यवसायात वाढ होईल. गैरसमज वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढवण्यासाठी छोटय़ा व्यक्तीला कमी लेखू नका. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक वाढेल.
शुभ दिनांक – 26, 27

मिथुन – सावध रहा
स्वराशीत बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून लाभयोग होत आहे. नोकरी, व्यवसायात तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल. फाजील आत्मविश्वासामुळे अडचणीत याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या विचाराने पुढे जा. अतिशयोक्ती धोकादायक ठरू शकते. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. शुभ दिनांक – 27, 28

कर्क – वाटाघाटीत यश मिळेल
कर्केच्या व्ययेषात बुधाचे राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. याच आठवडय़ात तुमची महत्त्वाची कामे करा. नोकरी, उद्योगधंद्यात तुमचे वर्चस्व वाढेल. वाटाघाटीत यश मिळेल. मन अस्थिर होईल. गुप्त कारवायांना कमी समजू नका. कोर्टाचे काम यशस्वी होईल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दिनांक – 29, 30

सिंह – परदेश गमनाची संधी
सिंहेच्या एकादशात बुध राश्यांतर, शुक्र-नेपच्यून लाभयोग होत आहे. नोकरी, धंद्यातील समस्या सोडवता येतील. चांगला बदल करण्याची संधी मिळेल. वाटाघाटीत फायदा होईल. प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. परदेशात जाण्यासाठी संधी मिळेल. कुटुंबातील तणाव कमी होईल. शुभ दिनांक – 26, 27

कन्या – मानसिक दडपण वाढेल
कन्या राशीच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. मानसिक दडपण वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा राहील. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. कुटुंबासाठी धावपळ होईल. कायदा सर्व ठिकाणी पाळा. मन अस्थिर झाल्याने निर्णय चुकण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक – 29, 30

तूळ – संयम बाळगा
तुळेच्या भाग्येषात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. तुमच्यावर संशयाची सुई ठेवली जाईल. गैरसमज पटकन होईल. काही लोक तुमच्या पाठीशी असतील. वाटाघाटीच्या वेळी संयम ठेवा. तरच फायदा होईल. कोर्ट केस अडचणीची ठरू शकते. शुभ दिनांक – 31, 1

वृश्चिक – सकारात्मक बदल घडतील
वृश्चिकेच्या अष्टमेषात बुधप्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल. मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा राहिली तरी वाटाघाटीत तणाव होईल. मित्रपरिवार दुरावण्याची शक्यता. कुटुंबात कामे वाढतील. शुभ दिनांक ः 28, 29

धनु – विचारपूर्वक निर्णय घ्या
धनुच्या सप्तमेषात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. मानसिक संतुलन राखता येईल. नोकरीधंद्यात तडजोड करावी लागेल. ठोस निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. कुटुंबात गैरसमज, धावपळ होईल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत संघर्षानेच यश मिळेल. मार्ग शोधता येईल. शुभ दिनांक- 26, 27

मकर – नवी संधी लाभेल
मकरेच्या षष्ठsशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. खंबीरपणे व्यक्त केलेले विचार प्रभावी ठरल्याने सर्वत्र तुमचे कौतुक होईल. गुप्त कारवाया करणारे राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमच्या विरोधात बडबड करतील. तुमच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होणार नाही. वेगळे काम करण्याची संधी कला क्षेत्रात मिळेल. शुभ दिनांक – 27, 28

कुंभ – संमिश्र घटना घडतील
कुंभेच्या पंचमेषात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. कुटुंबातील समस्या सुटली नसली तरी त्याला दिशा मिळेल. प्रकरण मार्गी लावता येईल. मन स्थिर राहील. वाटाघाटीत यश मिळवाल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत कौतुक झाले तरी पुरस्काराची शक्यता कमी असेल. शुभ दिनांक – 28, 29

मीन – लोकप्रियता लाभेल
मीनेच्या सुखेषात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमचे वर्चस्व राहील. प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. जमिनीसंबंधी प्रकरण तापेल. कुटुंबात सुखद घटना घडेल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत लोकप्रियतेत वाढ होईल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. शुभ दिनांक – 30, 31

आपली प्रतिक्रिया द्या