आठवड्याचे भविष्य

141

>> नीलिमा प्रधान

मेष – अपेक्षा ओळखा
शुक्र-हर्षल षडाष्टक योग, सूर्य-प्लुटो युती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत जवळच्या व्यक्तींच्या अपेक्षा ओळखा. त्यानुसार डावपेच टाका. चर्चा करा. यश खेचण्याची पॉवर तुम्ही ठेवा. प्रत्येक दिवस तुमचा असेल. उताविळपणे गुंतवणूक करू नका. कोर्टकेसमध्ये मार्ग निघेल.
शुभ दि. – 6, 7

वृषभ – कामामध्ये लक्ष ठेवा
चंद्र-गुरू लाभयोग, बुध-मंगळ केंद्रयोग होत आहे. व्यवसायात कोणत्या प्रकारची तडजोड करावयाची याबद्दल योग्य व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. कुटुंबातील ताणतणाव प्रेमाने सोडवण्यात यश मिळेल. नोकरीत कामामध्ये लक्ष ठेवा. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल. वरिष्ठांची मर्जी पाहून बोला.
शुभ दि. 7, 8

मिथुन – जवळच्या व्यक्तीशी वाद
चंद्र-बुध लाभयोग, सूर्य-प्लुटो युती होत आहे. मंगळवार, बुधवार कुटुंबात जवळच्या व्यक्तीशी वाद, गैरसमज होईल. धंद्यात मोहाचे क्षण येतील. दर्जेदार व्यक्तींचा सहवास नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत मिळेल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. काय देऊन काय मिळवायचे हे नीट ठरवा.
शुभ दि. – 6, 11

कर्क – तोंडघशी पडावे लागेल
चंद्र-शुक्र लाभयोग, बुध-मंगळ केंद्रयोग होत आहे. वागण्याबोलण्यात चूक झाल्यास तणाव निर्माण होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात लोकांना उभे केले जाईल. प्रतिष्ठsचा प्रश्न करून कोणतीही समस्या सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. तोंडघशी पडावे लागण्याची शक्यता.
शुभ दि. 7, 12

सिंह – तुमचे स्पर्धक वाढतील
सूर्य-प्लुटो युती, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. तुमची प्रगती पाहून तुमचे स्पर्धक वाढतील. व्यवसायातील त्रुटी समजून घेऊन त्यात सुधारणा करू शकाल. कुटुंबातील व्यक्तींची काळजी वाटेल. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते. वाहन जपून चालवा.
शुभ दि. 6, 10

कन्या – नम्रता ठेवा
चंद्र-शुक्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. जीवनसाथी, मुले यांच्या हट्टासाठी तुम्हाला तुमचा कार्यक्रम बदलावा लागेल. ठरविलेल्या कामात यश मिळेल. व्यवसाय परदेशात नेण्यात यशस्वी व्हाल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. गुरुवारी सावध राहा. नम्रता ठेवा. घरातील वरिष्ठांची काळजी घ्या.
शुभ दि. 7, 8

तूळ – लॉटरी लागण्याची शक्यता
चंद्र-बुध लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. व्यवसायात मोठा लाभ होईल. धंद्याला व्यापक स्वरूप देता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याकडे जबाबदार व्यक्ती म्हणून पाहिले जाईल. तुमचे मुद्दे विचारात घेतले जातील. लॉटरी लागण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःचे घर घ्याल. परदेशी जाण्याचा योग येईल.
शुभ दि. 6, 11

वृश्चिक – गुंतवणूक वाढेल
सूर्य-प्लुटो युती, चंद्र-मंगळ युती म्हणजे प्रत्येक अडचणीवर उपाय शोधणे. व्यवसायात थोरामोठय़ांची मदत मिळेल. गुंतवणूक वाढेल. कुटुंबात प्रेमाच्या माणसांचा विचार कराल. दिग्गज लोकांचा परिचय होईल. कोर्टाच्या कामात विशेष यश मिळेल. प्रेमाला चालना मिळणारी घटना घडेल.
शुभ दि. 7, 8

धनु- जिद्दीने यश मिळेल
शुक्र-हर्षल षडाष्टक योग, सूर्य-प्लुटो युती होत आहे. कोणत्याही प्रश्नावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. जिद्दीने यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करावयाचे ते ठरवा. नवीन परिचयाकडे आकर्षित व्हाल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. मौल्यवान खरेदी करताना सावध राहा.
शुभ दि. 9, 11

मकर – जीवनसाथी व मुलांचे सहकार्य
चंद्र-मंगळ युती, चंद्र-शुक्र त्रिकोणयोग होत आहे. व्यवसायात किरकोळ तडजोड करावी लागेल. कुठल्याही वरिष्ठांना कमी लेखू नका. जीवनसाथी, मुले यांचे उत्तम सहकार्य मिळेल. त्यांचा सल्ला घेता येईल. रविवारी नम्रता ठेवा. प्रेमाची माणसे तुमच्या पाठीशी राहतील. तत्परता व जिद्द ठेवल्यास ध्येय गाठता येईल.
शुभ दि. 11, 12

कुंभ – वेगाने काम करा
चंद्र-शुक्र लाभयोग, सूर्य-प्लुटो युती विचारांना प्रगल्भ करणारी ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणित तुम्ही समजून घ्याल. त्यामुळे डावपेच टाकण्याची पद्धत आणि वेळ कळेल. महत्त्वाचा आठवडा आहे. वेगाने काम करा. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. सोमवार, मंगळवार गुप्त कारवायांचा त्रास होईल.
शुभ दि. 11, 12

मीन – स्वार्थी लोक ओळखा
चंद्र-शुक्र लाभयोग, चंद्र-मंगळ युती होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्याला व्यवस्थित दिशा मिळेल, असा विचार करा. वेळेला महत्त्व द्या. व्यवसायात भावना आणि कर्तव्य नीट सांभाळा. संधी कमी वेळासाठी असते. स्वार्थी लोक ओळखा. कुटुंबातील लोकांची किंमत कळेल. बुधवार, गुरुवार सावध राहा.
शुभ दि. 7, 8

आपली प्रतिक्रिया द्या