आठवड्याचे भविष्य – ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१८

>> नीलिमा प्रधान

मेष – ठोस निर्णय घ्याल
सूर्य-गुरू लाभयोग, चंद्र-शुक्र युती होत आहे. राजकीय क्षेत्रात चर्चा करून ठोस निर्णय घेता येईल. महत्त्वाचे काम याच आठवडय़ात करा. तुमची प्रतिष्ठा व लोकप्रियता टिकवता येईल. उर्मटपणाने मात्र कुठेही वागू नका. धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. शुभ दिनांक – 9, 13

वृषभ – आर्थिक व्यवहारात सावधानता
चंद्र-मंगळ त्रिकोण योग, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात किरकोळ कारणावरून तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होईल. सामाजिक क्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा. मोठय़ा व्यवहारात मात्र कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. शुभ दिनांक – 10, 11

मिथुन – संधीचा लाभ घ्या
सूर्य-गुरू लाभयोग, सूर्य-प्लुटो त्रिकोण योग होत आहे. राजकीय क्षेत्रात दिग्गज लोकांच्या सहवासात राहाल. महत्त्वाचा निर्णय घ्या. सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा मिळेल. जनहितासाठी योजना पूर्ण करा. संधी कापराच्या वडीसारखी असते. व्यवसायाला व्यापक स्वरूप मिळेल. वर्चस्व दिसेल. शुभ दिनांक – 12, 13

कर्क – व्यवसायात जम बसेल
शुक्र-हर्षल प्रतियुती, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. श्री गणेश पूजनाची तयारी व्यवस्थित होईल. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा आदर करणारे लोक तुमच्या पाठीशी राहतील. जनतेचा कौल पाहून त्यांना मदत करण्याचे सत्र सुरू ठेवा. व्यवसायात जम बसेल. शुभ दिनांक – 10, 11

सिंह – राजकारणात वर्चस्व राहील
सूर्य-गुरू लाभयोग, चंद्र-शुक्र युती होत आहे. महत्त्वपूर्ण आठवडा आहे. अडचणीत आलेली कामे करून घ्या. राजकारणात तुमचे पारडे जड राहील. तुमचा खंबीर, महत्त्वाकांक्षी निर्णय कौतुकास्पद ठरेल. श्री गणेश पूजन यथासांग होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. योजनांना गती येईल. शुभ दिनांक – 12, 13

कन्या – संमिश्र घटनांचा काळ
चंद्र-मंगळ त्रिकोण योग, गुरू-प्लुटो लाभयोग होत आहे. संमिश्र स्वरूपाच्या घटना राजकीय क्षेत्रात घडतील. कठीण समस्येतून मार्ग शोधाल. सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करून दाखवता येईल. तुमच्या योजना थांबवण्याचा प्रयत्न तात्पुरता असेल. व्यवसायातील उलाढालीत सावध रहा. शुभ दिनांक – 13, 14

तूळ – नावलौकिक वाढेल
सूर्य-प्लुटो त्रिकोण योग, चंद्र-मंगळ केंद्र योग होत आहे. श्री गणेशाच्या आगमनाची योग्य काळजी घ्या. गणेश पूजन नीट होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय होईल. सामाजिक कार्यात पाठिंबा राहील. कला-क्रीडा क्षेत्रांत नावलौकिक वाढेल. दर्जेदार भूमिका मिळेल. नोकरीत प्रभाव दिसेल. शुभ दिनांक – 13, 14

वृश्चिक – अनाठायी खर्च वाढेल
सूर्य-प्लुटो त्रिकोण योग, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. श्री गणेश पूजनाच्या दिवशी संयम ठेवा. मनाचा गोंधळ होईल. स्थिर चित्ताने पूजन करा. राजकीय क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. अनाठायी खर्च वाढण्याची शक्यता. शुभ दिनांक – 10, 11

धनु – उन्नतीचा मार्ग मिळेल
सूर्य-गुरू लाभयोग, चंद्र-शुक्र युती होत आहे. या आठवडय़ात तुमचे महत्त्वाचे काम होईल. उत्साह व आत्मविश्वास वाढेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची चर्चा करा. ठोस निर्णय घ्या. सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण कराल. व्यवसायात मोठे काम घ्या. मदत नाकारू नका. स्वतःच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळेल. शुभ दिनांक- 11, 13

मकर – कार्याला वेग लाभेल
चंद्र-शुक्र युती, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. रविवार तणाव होईल. त्यानंतर तुमच्या सामाजिक कार्याला वेग प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात तुमचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी इतरांचे लाभेल असे नाही. व्यवसायात समस्या येईल. सावधगिरी बाळगा. कला-क्रीडा क्षेत्रांत प्रभाव पडणे कठीण आहे. शुभ दिनांक- 13, 14

कुंभ – परदेशी जाण्याचा योग
सूर्य-प्लुटो त्रिकोण योग, चंद्र-शुक्र युती होत आहे. कामास विलंब होईल. वाहन जपून चालवा. राजकीय क्षेत्रात मोठा निर्णय याच आठवडय़ात करा. सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा मिळेल. लोकप्रियता वाढेल. व्यवसायात फायदा होईल. श्री गणेश पूजन मनोभावे करू शकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दिनांक – 13, 14

मीन – मनोबल राखा
चंद्र-मंगळ त्रिकोण योग, चंद्र-शनी लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो संघर्ष वाढेल. नम्रता ठेवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तणाव, मतभेद होईल. तुमच्या कार्यपद्धतीचा इतरांना त्रास होईल. व्यवसायात व्याप वाढेल. भागीदार, कामगार यांचे असहकार्य त्रासदायक वाटेल. कायदा मोडू नका. शुभ दिनांक -ः 11, 15.