भविष्य- रविवार २५ फेब्रुवारी ते शनिवार ३ मार्च २०१८

3

>>नीलिमा प्रधान

मेष- प्रतिष्ठा मिळेल
आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करण्यात गैरसमज होईल. राजकीय क्षेत्रात विरोधकांच्या चुका स्पष्टपणे तुमच्या नजरेत भरतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. लोकांचा विश्वास संपादन करू शकाल. सर्वच क्षेत्रांतील कठीण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात लाभ मिळेल.
शुभ दि. २५, २६

वृषभ -समस्या कमी होतील
तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राहील. सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रांतील प्रत्यक्ष काम सुरू होईल. घेतलेले श्रम कारणी लागतील. कुटुंबात एकसूत्रता आणता येईल. नम्रता व संयम ठेवा. कुठेही अतिरेक व घाई नको.
शुभ दि. २६, २७

मिथुन -मनाप्रमाणे घटना घडतील
आठवडय़ाचा प्रत्येक दिवस प्रगतिकारक ठरेल. होळीच्या अग्नीत दुरितांचे दुष्ट जाळे जळून जाईल. स्वच्छ प्रकाशाचा मार्ग दिसेल. नोकरीत मनाप्रमाणे घटना घडेल. शक्ती वापरता येईल. सामाजिक कार्यात जस्त लक्ष दिल्यास व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. व्यवसायात जम बसेल.
शुभ दि. २७, २८

कर्क – मतभेद संभवतील
राजकीय क्षेत्रात वरिष्ठांच्या समवेत मतभेद होतील. तुमच्या कार्याचा अनुभव त्यांना तपासून पाहावा लागेल. टीकात्मक चर्चा तुमच्याबद्दल होतील. कोर्ट केसमध्ये सावधपणे बोला. कुटुंबात जवळच्या व्यक्तीची चिंता वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रांत मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे.
शुभ दि. २७, २८

सिंह – विचारांना चालना मिळेल
या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घ्या व कामे करा. राजकीय क्षेत्रात चर्चा करा. दौऱयात यश मिळेल. होळी पौर्णिमेच्या दिवशी विचारांना चालना देणारी घटना घडेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. नोकरीत कठीण कामे प्रथम करा. व्यवसायात मोठे काम मिळेल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
शुभ दि. २५, २६

कन्या – संयम बाळगा
आठवडय़ाच्या मध्यावर तुमच्यावर एखाद्या प्रकरणाचे दडपण येईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कष्ट पडतील. सामाजिक कार्यात आर्थिक चिंता राहील. धंद्यात वेळेवर व्यक्त करून देण्यात क्षुल्लक अडथळा येईल. नम्रता व संयम ठेवा. नोकरीत वरिष्ठांची नाराजी होऊ शकते.
शुभ दि. २५, २६

तूळ – सकारात्मक कालावधी
मनाप्रमाणे गोष्टी घडण्यात यश मिळेल. गरज असलेली कामे करा. राजकीय क्षेत्रात मोठी संधी येईल. वरिष्ठांचा वरदहस्त तुमच्यावर राहील. सामाजिक योजना विचारपूर्वक तयार करा. म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल. कोर्ट केसमध्ये आशादायक परिस्थिती राहील.
शुभ दि. २८, ३

वृश्चिक -विचारपूर्वक निर्णय घ्या
आठवडय़ाच्या सुरुवातीला किरकोळ ताणतणाव होईल. राजकीय क्षेत्रात विचारपूर्वक डावपेच टाकावे लागतील. सामाजिक कार्य करताना विचार करा. लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करा. जनतेच्या अडचणी जाणून घ्या. नाटय़-चित्रपट क्षेत्रांत प्रगती होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येऊ शकतो.
शुभ दि. २७, २८

धनु – यशदायी काळ
साडेसातीमध्ये माणसाच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळत असते. प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. किरकोळ दुखापत संभवते. राजकीय क्षेत्रात तुमच्या पाठीशी वरिष्ठ असले तरी तुम्ही स्वः समस्या सोडवण्याचा प्रयत्न जास्त करा. यश मिळेल. सामाजिक बांधिलकी जपा आणि त्यानुसारच निर्णय घ्या.
शुभ दि. २५, २६

मकर – अनुभवाचा वापर करा
उन्नतीसाठी महत्त्वाचा काळ. कुटुंबातील व्यक्तीच्या समस्या सोडवता येतील. घर, वाहन, जमीन खरेदीचा विचार होईल. राजकीय क्षेत्रात अनुभवाने आलेले शहाणपण नेहमीच निश्चित स्वरूपाचे असते. त्याचा उपयोग करून घ्या. सामाजिक कार्याचा विस्तार होईल. नवीन व्यक्तीचा परिचय होईल.
शुभ दि. २७, ३

कुंभ -चौफेर प्रगती होईल
तुमच्या ध्येयाकडे तुमची घोडदौड जोमाने होईल. वेळेला महत्त्व द्या. योजना बनवा. विचारांना चालना राजकीय क्षेत्रात मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. सामाजिक कार्यात मतभेद होतील. तुमचा दृष्टिकोन योग्य असेल तरी गुप्त कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नव्या कार्याचा आरंभ होईल.
शुभ दि. २५, २६

मीन – मनोबल राखा
राजकीय क्षेत्रात तुमच्यावर आरोप होतील. त्यामुळे मन अस्थिर होईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. कुटुंबात ताणतणाव होईल. धंद्यात नवे काम समोरून येईल. मात्र सावध राहा. गुंवतणूक करण्याचा उतावळेपणा नको. कोर्टाच्या कामात अडचणी वाढू शकतात.
शुभ दि. २६, २७