आठवड्याचे भविष्य- रविवार १ ते शनिवार ७ ऑक्टोबर २०१७

96
  • नीलिमा प्रधान

मेष
कामाचा व्याप वाढेल
तुमच्या कार्यातील अडचणी वाढतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग दिसतील. जुने अनुभव व नवीन राजकीय परिस्थिती यांचा योग्य मेळ घाला. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावेत. नाट्य-चित्रपट क्षेत्रात वेळप्रसंगानुरूप मत मांडा.
शुभ दि. २, ३

वृषभ
लोकांचे सहकार्य लाभेल
वेळच्या वेळी कामे करण्याची पद्धत जास्त उपयोगी ठरेल. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत जम बसवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा. कुणालाही आरोप करण्याची संधी देऊ नका. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळवा. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळवता येईल.
शुभ दि. १, ३

मिथुन
गैरसमज उद्भवतील
कुटुंबात तणाव व वाद होईल. व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन कंत्राट मिळेल. वेळेला महत्त्व द्या.राजकीय-सामाजिक क्षेत्रात किरकोळ गैरसमज होतील. खरेदीचा विचार कराल. नाटय़-चित्रपटात-संगितात विशेष यश मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. उत्साहवर्धक वातावरण तयार होईल.
शुभ दि. ४, ५

कर्क
महत्त्वाचे वाद मिटतील
तुमचा उत्साह व आत्मविश्वास याचे कौतुक होईल. प्रवासात सावध रहा. व्यवसायात लक्ष दिल्यास फायदा वाढेल. जमिनीसंबंधी वाद मिटवता येईल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. योजना पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. कलाक्षेत्रात आर्थिक लाभ मिळेल.
शुभ दि. ५, ६

सिंह
ध्येयाकडे लक्ष द्या
मानसिक दडपण निर्माण होईल. व्यवसायात वाढ होईल. कामाचा व्याप व्यापक स्वरूप धारण करेल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात विचारांचा गुंता होईल. आपसातील मनभेदाला जास्त महत्त्व न देता तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवा. योजनाबद्ध कामांचे नियोजन करा.
शुभ दि. २, ३

कन्या
काळजीपूर्वक पाऊल उचला
सोमवार, मंगळवार कोणताही निर्णय घेउै नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. तुमचे बोलणे सर्वांना पटेल. वरिष्ठ तुमच्या मुद्यांचा प्रामाणिकपणे विचार करतील. सरकारी नेते लोक संभ्रमात पडतील. थोडी नाराजी सहन करावी लागेल. व्यवसायात लक्ष द्या. गुंतवणूक वाढवू नका. भागीदारांबरोबर वाद होईल.
शुभ दि. १, ५ 

तूळ
निर्णयात सावधगिरी बाळगा
नोकरीच्या ठिकाणी कामात चुका होऊ शकतात. सावध रहा. कोणताही निर्णय नियमांच्या विरोधात घेऊ नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विरोधात बोलताना कायद्याचे भान ठेवा. प्रसंगाचे गांभीर्य पाहून निर्णय घ्या.दुसऱ्यांच्या आश्वासनावर कोणताही निर्णय घेऊ नका. कर्तव्यात कसूर नको.
शुभ दि. २, ३

वृश्चिक
वर्चस्व वाढेल
व्यवसायात चांगला फायदा होऊ शकेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कुटुंबातील समस्या सोडवाल. जमिनीसंबंधी व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वर्चस्व राहील. आप्तजनांच्या सहवासाने उत्साह वाढेल. नाटय़-चित्रपट क्षेत्रात दर्जेदार ओळखी होतील.
शुभ दि. ५, ६

धनू
उत्साहवर्धक कालावधी
ठरविलेल्या कार्यक्रमात मनाप्रमाणे यश मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. कुटुंबात मुलांच्या समस्या सोडवता येतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात रेंगाळत पडलेली कामे पूर्ण करा. लोकप्रियतेत भर पडेल. आर्थिक मदत मिळेल. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. व्यवसायात जम बसेल. विचारांना चालना मिळेल.
शुभ दि. १, २

मकर
योजना मार्गी लागतील
तुम्ही ठरविलेले कार्य सर्वांना आवडेल. लोकप्रियता मिळवण्यास थोडा विलंब होईल. परंतु प्रतिष्ठा वाढेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचे विचार व योजना यांना गती मिळेल. कौटुंबिक वाटाघाटीत गैरसमज होईल. कोर्टकेसमध्ये बौद्धिक चमक दिसेल. व्यवसायात कोणताही करार भावनेच्या आहारी जाऊन करू नका.
शुभ दि. ३, ५

कुंभ
मनोबल राखा
तुमची कार्यासंबंधीची तळमळ कितीही खरी असली तरी त्याच्यावर आक्षेप घेतला जाईल. आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमच्यावर दबाव येईल. तुमचे परखड शब्द इतरांना बोचतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल. उत्साहावर नियंत्रण ठेवा.
शुभ दि. ६, ७

मीन
प्रयत्नांत कसूर नको
येणाऱया अडचणीवर मात करून महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात वाद व तणाव होईल. मतभेद होतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तडजोड करावी लागेल. आर्थिक व्यवहारात फसगत होऊ शकते. योजना पूर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा.
शुभ दि. १, ५

आपली प्रतिक्रिया द्या