आठवड्याचे भविष्य रविवार 13 ते शनिवार ते 19 जानेवारी 2019

5

>> नीलिमा प्रधान

मेष – एकत्रित कार्य करा
मेषेच्या दशमेशात सूर्याचे राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांनी तिळाच्या लाडवासारखे सर्वांना एकत्र करून कार्य केले पाहिजे. पण गूळ मात्र चिक्कीचा घेतला पाहिजे, तरच तो मजबूतपणे टिकून प्रगती करील. ओळखी वाढतील. प्रेमाला चालना मिळेल. वाहवत जाऊ नका. शुभ दिनांक ः 17, 18

वृषभ – ‘संक्रांत’ उलटवता येईल
वृषभेच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरु प्रतियुती होत आहे. तुमच्यावर संक्रांत आणणाऱयांवरच तुम्हाला ती तिळगुळाचा गोड लाडू देऊन उलटवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द, महत्त्वाकांक्षा प्रभावी ठरू शकते. मोठे कंत्राट मिळेल. परदेशात नोकरीसाठी जावे लागेल.
शुभ दिनांक ः 18, 19

मिथुन – मेहनतीशिवाय पर्याय नाही
मिथुनेच्या अष्टमात सूर्याचे राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. अधिकाराचा वापर गुळासारखा करावा. तेव्हाच तिळाचा स्नेह अनुभवता येईल. कुटुंबात जबाबदारी वाढेल. व्यवसायात मेहनतीशिवाय पर्याय नाही. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात मोहाचे क्षण येतील. नोकरीत सावध राहा.
शुभ दिनांक ः 19, 20

कर्क – योजनापूर्तीकडे लक्ष द्या
कर्केच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र-गुरु प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बदल करण्याची क्षमता वाढेल. योजनापूर्तीकडे लक्ष द्या. शनिवारी व्यवसायात किरकोळ मतभेद होतील. गुप्त कारवायांना थोपवता येईल. कुटुंबात वाटाघाटीचा प्रश्न सुटण्याची आशा वाटेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवाल. शुभ दिनांक ः 13, 15

सिंह – स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा
सिंह राशीच्या षष्ठsशात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला कमकुवत करण्याचा डाव विरोधक करीत असतील. गुप्त कारवायांना कमी लेखू नका. तुमचे मनोधैर्य शाबूत राहील. कुटुंबात नाराजीचा सूर निघेल. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. शुभ दिनांक ः 17, 18

कन्या – मोठे आश्वासन मिळेल
कन्येच्या पंचमेषात सूर्य, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या समस्येवर तुम्हाला विचार करावा लागेल. दुसऱयांना मदत करण्याची वृत्ती त्रासदायक वाटू शकते. व्यवसायात वाढ होईल. गुंतवणूक करणारे पुढे येतील. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात दर्जेदार लोकांचा परिचय होईल. मोठे आश्वासन मिळेल. शुभ दिनांक ः 13, 18

तूळ – मदतीची अपेक्षा ठेवू नका
तुळेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. व्यवसायाला कलाटणी मिळेल. ठरवलेले प्रकल्प मार्गी लावता येतील. मदतीची अपेक्षा ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यपद्धतीत बदल करण्याची वेळ येऊ शकते. गोड बोलणारा माणूस ओळखण्यात चूक करू नका.
शुभ दिनांक ः 15, 19

वृश्चिक – उत्साह हीच प्रगती
वृश्चिकेच्या पराक्रमात सूर्य, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. व्यवसायात नवा विषय शिकायला मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कार्याचा नव्याने आढावा घ्या. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुटुंबातील व्यक्तींची नाराजी संपवता येईल. तुमचा उत्साह हीच तुमची प्रगती ठरू द्या. शुभ दिनांक ः 13, 14

धनु – हिशेब नीट करा
धनुच्या धनेषात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. व्यवसायात छोटे काम मिळाले तरी घ्या. व्यवहारात हिशेब नीट करा. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. कुटुंबातील समस्येवर पती-पत्नीच्या परस्पर सहभागाने मार्ग निघू शकतो. आठवडय़ाच्या शेवटी तणाव होईल.
शुभ दिनांक ः 13, 14

मकर – प्रतिष्ठा तेजस्वी होईल
स्वराशीत सूर्य राश्यांतर आणि चंद्र-गुरु प्रतियुती होत आहे. तुमची कार्य करण्याची पद्धत भव्यदिव्य असते. शिस्त ठेवता, त्यामुळेच कोणतेही कठीण काम करून घेण्याची धमक तुमच्यात असते. या आठवडय़ात राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तुमची प्रतिष्ठा अधिक तेजस्वी होईल.
शुभ दिनांक ः 15, 17

कुंभ – डोळय़ांची काळजी घ्या
कुंभेच्या व्ययेशात सूर्य, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. क्षेत्र कोणतेही असले तरी तुम्हाला गुप्त कारवाया आणि विरोधाचा सामना करावा लागेल. अर्थात मानसिक संतुलन कायम राहिल्याने योग्य निर्णय घेता येईल. डोळय़ांची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.
शुभ दिनांक ः 13, 14

मीन – व्यवसायात जम बसेल
मीनेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, शुक्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावणारा असेल. नाराज झालेल्यांना तिळगुळाचा लाडू देउैन त्यांच्याशी संबंध दृढ करा. व्यवसायात जम बसेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. शुभ दिनांक ः 14, 15