विमानात पहिल्यांदा तुलू भाषेतून प्रवाशांचे स्वागत

विमानात बसताच पायलट किंवा विमानातील क्रू मेंबर्स आधी सर्व प्रवाशांचे स्वागत करतात. प्रवाशांना काही सूचना देतात. या सूचना शक्यतो इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. मात्र नुकतेच विमानात तुलू या स्थानिक भाषेत सूचना देण्यात आल्या.  मुंबई-मंगळुरू विमानातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 ही घटना गेल्या आठवडय़ात मुंबईहून मंगळुरूला जाणाऱया  विमान क्रमांक 6 ई 6051 या विमानात घडली. फर्स्ट ऑफिसर प्रदीप पद्मशाली यांनी मंगळुरूसाठी निघालेल्या प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला.  विमान धावपट्टीवर आल्यानंतर त्यांनी प्रवाशांना पुढील सूचना देण्यासाठी माइक हातात उचलला आणि चक्क तुलू भाषेत बोलायला सुरुवात केली. तसेच प्रवासादरम्यान आरामदायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या पायलटने याच सूचना इंग्रजीमध्ये आणि नंतर हिंदीमध्येसुद्धा दिल्या. तुलू भाषा ऐकून प्रवासी आनंदी झाले. त्यांनी मातृभाषेतच दाद दिली.