संविधानापेक्षा कुराण श्रेष्ठ, मंत्र्याने तोडले अकलेचे तारे

1

सामना ऑनलाईन । कोलकाता

केंद्र सरकारने तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारा अध्यादेश जारी केला आहे. पश्चिम बंगालचे राज्यमंत्री सिद्दिकुल्ला चौधरी यांनी या प्रकरणी वादग्रस्त विधान केले आहे. चौधरी म्हणाले की “कुराण शरीफ हेच प्रमाण आहे. संविधान आणि कुठलाच कायदा त्याहून श्रेष्ठ असू शकत नाही.”  राज्यातील अनेक मुस्लीम संगठनांनी या अध्यादेशाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप झालेला चालणार नाही अशी भुमिका अनेक अल्पसंख्यांक नेत्यांनी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

चौधरी म्हणाले की “आमच्यासाठी आमचा पवित्र धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे, या पवित्र ग्रंथाचा आणि संविधानाचा दुरान्वये ताळमेळ नाही. त्यामुळे आम्ही धर्मग्रंथालाच प्रमाण मानू, संविधानाला नाही. भाजप धर्माधिष्ठित राजकारण करत असून संविधानाशी खेळत आहे. तिहेरी तलाकवरील अध्यादेशाने मुस्लिम समुदायाला काहीच फरक पडणार नाही. कोणीच या कायद्याला मानणार नाही पण धर्म आणि आमच्या पवित्र कुराणला माननार.” असे त्यांनी यावेळी म्हटले. चौधरी पश्चिम बंगाल राज्याचे राज्यमंत्री असून जमाएत ए इस्लामी हिंद संस्थेचे प्रदेशाध्यक्षही आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवल्यानंतर तो निर्णयही असंविधानिक असल्याचे त्यांनी म्हटले होते.