वेस्ट इंडीजने कसोटी हरली, पण मालिका जिंकली

1

सामना ऑनलाईन । ग्रॉस इस्लेट

इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी बाजी मारली, मात्र पहिल्या दोन कसोटी जिंकून वेस्ट इंडीजने आधीच मालिका खिशात टाकली होती. तिसऱया कसोटीत 232 धावांनी पराभव झाल्याने निर्भेळ यशापासून वंचित राहिलेल्या विंडीजने मालिका 2-1 फरकाने जिंकली. पहिल्या डावात 5 बळी टिपणारा मार्क वूड सामन्याचा मानकरी ठरला, तर ‘मालिकावीरा’ची माळ विंडीजच्या केमार रोच याच्या गळय़ात पडली. इंग्लंडने 277 धावा केल्यानंतर वेस्ट इंडीजला 154 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 123 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर 105.2 षटकांत 5 बाद 361 धावसंख्येवर इंग्लंडने आपला दुसरा डाव घोषित करून विंडीजपुढे विजयासाठी 485 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या विंडीजचा संघ 69.5 षटकांत 252 धावांवरच गारद झाल्याने त्यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.