नववर्ष स्वागतासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्या

फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

नववर्षाच्या स्वागतासाठी पश्चिम रेल्वेने आठ तर मध्य रेल्वेने चार विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे आणि मरीन ड्राइव्ह येथे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर चार विशेष लोकल तर विरार ते चर्चगेट मार्गावर चार विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल फेऱ्या
स्पेशल – १ चर्चगेटवरून मध्यरात्री १.१५ वाजता सुटून पहाटे २.५५ वाजता विरारला पोहचेल. तर उलट दिशेला अप मार्गावर स्पेशल -२ विरारहून रा.१२.१५ वाजता सुटून चर्चगेटला रात्री १.४७ वाजता पोहचेल. स्पेशल -३ चर्चगेटहून रा.२ वाजता सुटून विरारला पहाटे ३.४० वाजता पोहचेल. स्पेशल -४ विरारहून रात्री १२.४५ वाजता सुटून चर्चगेटला रा.२.१७ वाजता पोहचेल. तर स्पेशल -५ चर्चगेटहून रा.२.३०वाजता सुटून विरारला पहाटे ४.१० वाजता पोहचेल. स्पेशल -६ विरारहून १.४० वाजता सुटून चर्चगेटला रा.३.१२वाजता पोहचेल. स्पेशल-७ चर्चगेटवरून रा.३.२५ वाजता सुटून विरारला पहाटे ५.०५ वाजता पोहचेल. स्पेशल-८ विरारहून रा.३.०५ वाजता सुटून चर्चगेटला पहाटे ४.३७ वा. पोहचेल.

मध्य रेल्वेच्या चार विशेष फेऱ्या
मध्य रेल्वेवर डाऊन मार्गावर सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता पनवेल विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे तीन वाजता पोहचेल. तर अप मार्गावर कल्याण येथून मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी विशेष लोकल सुटून ती सीएसएमटीला पहाटे ३ वाजता पोहचेल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटीहून १.३० वाजता पनवेल विशेष लोकल सुटून पनवेलला ती पहाटे २.५० वाजता पोहचेल. तर अप मार्गावर पनवेल येथून १.३० वाजता सीएसएमटी विशेष लोकल सुटून सीएसएमटीला २.५० वाजता पोहचेल.