83 : रणवीरची पत्नी बनण्यासाठी दीपिकाने घेतले 14 कोटी?

146
ranveer-singh-deepika-83

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील रोमँटिक कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आगामी ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. कबीर सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून रणवीर 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. चौथ्यांदा ही जोडी चित्रपटगृहांमध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाची भूमिका छोटीशी असून जास्त सिन्सही तिच्या वाटेला आलेली नाहीत. त्यामुळे तिने ही भूमिका का स्वीकारली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डेक्क्न क्रॉनिकलने सूत्रांच्या हवाल्याने यामागील कारण स्पष्ट केले आहे. दीपिका पदुकोणने दोन कारणांमुळे 83 चित्रपटातील छोट्या भूमिकेला होणार दिला. पहिले म्हणजे रिअर लाईफमधील पतीच रिल लाईफमध्ये पतीच्या भूमिकेत असणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे या छोट्या भूमिकेसाठी तिला भरभक्कम रक्कम मिळाली आहे. कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकरण्यासाठी दीपिकाला तब्बल 14 कोटी रुपये एवढे मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे.

सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण लंडनमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने चित्रपटातील रोमी भाटिया अर्थात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, आपचे वैयक्तीक संबंध काम करताना कधीही मध्ये येत नाहीत. रणवीरच कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो. परंतु चित्रपटामध्ये एखाद्या दुसऱ्या अभिनेत्याने जरी कपिल देव यांची भूमिका साकारली असतील तरीही मी मला मिळालेली भूमिका केली असती.

आपली प्रतिक्रिया द्या