सामना पावसामुळे रद्द झाला असता तर, फायनलमध्ये कोण?

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम सामन्यात पोहचेल. मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर कोणता संघ अंतिम सामन्यात जाईल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोलकाता आणि मुंबई दरम्यानच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना झाला नाही तर मुंबईचा संघ अंतिम सामना खेळण्यासाठी पात्र ठरेल. कारण साखळी सामन्यात मुंबईचा संघ सर्वोच्च स्थानावर होता, त्याचा फायदा मुंबईला होईल. त्यामुळे कोलकाताला घरचा रस्ता पकडावा लागेल.

याआधी कोलकाता आणि हैद्राबादच्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. एकवेळ पावसामुळे कोलकाताला सामना गमवावा लागेल अशी परिस्थिती होती. मात्र वरुण राजाच्या कृपेमुळे पाऊस थांबला आणि कोलकाताने हैद्राबादचा सात विकेट्सने पराभव केला.