जाणून घ्या मातृदिनाबद्दल…

51

सामना ऑनलाईन । मुंबई

मे महिन्यातला दुसरा रविवार हा जगभरात मातृदिन (मदर्स डे) म्हणून साजरा केला जातो. आजही मातृदिन असून अनेकजण तो आपल्या परीने साजराही करत आहेत. आपल्या मुलांसाठी अहोरात्र झटणाऱ्या आईप्रती कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी, तिच्याप्रती असलेले प्रेम, आदर व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे. गूगलही या अपवाद नाही त्यांनीही आईची प्रतिमा दर्शवणारे डूडल ठेवून समस्त महिलांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की काही देश वगळता इतर देशात वेगवेगळ्या तारखेला मातृदिन दिन साजरा केला जातो. आपल्या देशात मात्र प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. जगातील एकूण ४६ देशांमध्ये आजचा दिवस मातृदिन म्हणून जल्लोषात साजरा केला जातो.

anna-javers

अशी झाली मदर्स डेची सुरुवात

१९०८ साली अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या अॅना जार्विस यांनी मदर्स डे सुरू केला. आईच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या अॅना अविवाहित होत्या. आईच्या निधनानंतर त्यांनी अमेरिकेत St. Andrew’s Methodist Church in Grafton, येथे आईच्या स्मरणार्थ मदर्स डे कार्यक्रम ठेवला. अमेरिकेत आईच्या नावाने होणारा असा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कुटुंबासाठी आईच नाही तर कुटुंबातले सर्वच सदस्य राबत असतात. यामुळे आईच्याच नावाने दिवस का साजरा करायचा? तसेच सासूच्या नावाने का नाही असा प्रश्न विचारून सरकारी अधिकाऱ्यांनी अॅनाची खिल्ली उडवली. पण मातृदिन साजरा करण्याबाबत अॅना ठाम होती. यासाठी तिने कॅम्पेनही सुरू केले. तिने थेट आईसाठीच साद दिल्याने संपूर्ण व्हर्जिनिया तिच्या पाठीशी ठाम उभा राहिला. हळूहळू संपूर्ण अमेरिकेत मदर्स डे व अॅनाच्या धाडसीपणावर चर्चा झडू लागल्या. अखेर १९११ मध्ये जनतेच्या कौलापुढे अमेरिकेचे सरकारही हतबल झाले व त्यांनी शासकीय सुट्ट्यांमध्ये मदर्स डेचा समावेश केला, जो आजतागायत कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या