व्हॉटस्ऍप, फेसबुक डाऊन नेटकरी संतापले


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

फेसबुक हे सोशल मीडिया माध्यम जगभरात रविवारी सायंकाळी काही काळासाठी ढेपाळल्यानंतर आता पुन्हा जोमाने काम करू लागले आहे. या कालावधीत फेसबुकच्याच व्हॉटस्ऍप आणि इन्स्टाग्राम या साइटस्चाही घोळ झाला होता असे काही युजर्सना लक्षात आले. जगातील अनेक युजर्सच्या मोबाईलवर फेसबुक व्यवस्थित काम करत असल्याने ते डाऊन झाले आहे हे कुणाला फारसे कळलेही नाही. मात्र जे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर फेसबुक चालवणाऱयांना मात्र ते डाऊन असल्याचे जाणवले.

हिंदुस्थानात दुपारी 4 वाजल्यानंतर फेसबुकला प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार ही समस्या सर्वात जास्त अमेरिका, तुर्की आणि मलेशिया येथे जाणवली. या देशांमध्ये व्हॉटस्ऍपवरही युजर्स आपापले मेसेज पाठवू शकत नव्हते. काहीजणांचे मेसेज जात होते, पण तसे डिलिव्हरीची चिन्हे दिसत नव्हती. फेसबुकवरही पोस्टस् पाठवू शकत नव्हते.

मार्चमध्येही फेसबुक डाऊन

विशेष म्हणजे गेल्या महिन्यातही 13 मार्च रोजी रात्री साधारण 9.30 वाजल्यापासून फेसबुक डाऊन झाले होते. मात्र काही मिनिटांतच फेसबुकची सेवा पूर्ववत सुरू झाली होती. त्याचवेळी फेसबुकही बारगळले होते. यात फेसबुकचा मेसेंजर आणि इन्स्टाग्रामही ढेपाळले होते.