व्हॉट्सअॅपकडून हिंदुस्थानसाठी तक्रार निवारण अधिकार्‍याची नियुक्ती


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानामध्ये वाढलेले फेक न्युज रोखण्यासठी व्हॉट्सअॅपने तक्रार निवारणासाठी ग्रीवन्स ऑफिसरची नियुक्ती केली आए. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना आता थेट या अधिकार्‍याकडे तक्रार करता येईल. व्हॉट्सअॅपकडून कोमल लाहिडी यांची ग्रीवन्स ऑफिसरपदी नियुक्त केले आहे.

जर तुम्हाला फेक न्युज बद्दल कुठली तक्रार करायची असेल तर आपल्या व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन Help वर क्लिक करावे त्यावर Contact us वर क्लिक केल्यावर तुम्हाला ग्रीवन्स ऑफिसरकडे तक्रार दाखल करता येईल.

व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार कोमल लाहिडी या अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधून आपले कार्य करतील. कुणालाही त्यांच्याशी कागदोपत्री संवाद साधायचा असल्यास त्यांना मेनलो ऑफिसच्या पत्त्यावर पत्र पाठवून संपर्क साधण्याचा पर्याय कंपनीने दिला आहे. काही अमेरिका कंपन्यांनीही हिंदुस्थानसाठी अशाच प्रकारे ग्रीवन्स ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे.

कोमल लाहिडी या मार्च 2018  पासून व्हॉट्सअॅपच्या ग्लोबल कस्टरमर ऑपरेशनमध्ये सिनियर डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. 2014 साली त्या फेसबुकमध्ये एका मोठ्या पदावर त्या रुजू झाल्या होत्या. लाहिडी यांनी पुण्यातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

देशात तक्रार अधिकारी का नाही? सर्वोच्च न्यायालयाचा व्हॉट्सअॅपला सवाल

मागील महिन्यात व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डॅनियल यांनी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. फेक न्युजला आळा घालण्यासाठी काही पर्याय देण्याबाबत प्रसाद यांनी व्हॉट्सअॅपच्या सीईओंना सांगितले होते. तसेच याबाबतीत ग्रीवन्स ऑफिसर नियुक्त करण्याबाबतही त्यांनी सांगितले होते.