व्हॉट्सअॅपला ‘हा’ इमोजी हटवण्यासाठी आली नोटीस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्याच्या काळात संवाद साधण्यासाठी उत्तम साधन असलेल्या व्हॉट्सअॅपला दिल्लीतील एका वकिलाने मंगळवारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. व्हॉट्सअॅपमध्ये आक्षेपार्ह खूण असलेला एक इमोजी आहे. तो इमोजी काढून टाकण्यासाठी व्हॉट्सअॅपला ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये १५ दिवसांच्या आतमध्ये आक्षेपार्ह खूण असलेली इमोजी हटविण्याचं नमूद करण्यात आलं आहे.

दिल्लीतील न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील गुरमीत सिंह यांनी ही नोटीस व्हॉट्सअॅपला पाठविली आहे. व्हॉट्सअॅपमधील आक्षेपार्ह खूण असलेला इमोजी फक्त बेकायदेशीर नाही तर अश्लील इशाराही असल्याचं नोटीस पाठविलेल्या वकिलांचं म्हणणं आहे. तसेच आक्षेपार्ह खूण असलेला इमोजी अतिशय आक्रमक इशारा आहे. तसेच व्हॉट्सअॅपमध्ये आक्षेपार्ह खूण असलेल्या इमोजीचा वापर करणं म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रोत्साहन देणं असंही वकिलांनी म्हटलं आहे. वकील गुरमीत सिंह यांनी हा इमोजी काढून टाकायला सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपने जर हा इमोजी १५ दिवसांत हटवला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.