आता व्हॉट्सअॅपवर ठेवा कव्हर फोटो, लवकरच नवे फीचर

जगभरात दोन अब्जाहून अधिक व्हॉट्सअॅप युजर्स आहेत. युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असते. आताही एक नवे फीचर येणार आहे. यामुळे युजर्सला आता व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर फेसबुकसारखा कव्हर फोटो सेट करता येणार आहे. सध्या या फीचरवर टेस्टिंग सुरू आहे. जेव्हा ते बीटा परीक्षकांकडून पास केले जाईल, तेव्हा बिझनेस प्रोफाईल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील, अशी माहिती डब्ल्यूएबीटा इन्फोने दिली आहे.