WhatsApp मध्ये झाला छोटा पण महत्त्वाचा बदल, तुम्हाला कळला का?

46


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगभरात कोट्यवधी लोकं वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये सातत्याने बदल होत असतात. ग्राहकांना व्हॉट्सअॅप नेहमची नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. आताही एक असाच छोटासा पण महत्त्वाचा बदल व्हॉट्सअॅपमध्ये झाला आहे. हा बदल कोणत्या फिचर अथवा सेवेमध्ये झालेला असून व्हॉट्सअॅपच्या डिझाईनमध्ये झाला आहे.

नवीन बदलानुसार व्हॉट्सअॅपच्या सेटिंग (Setting) पर्यायाचा लूक आणि लेआऊट बदलला आहे. याआधी सेटिंग पर्यायामध्ये ग्राहकांना Account, Chats, Notification, Payments, Data & Storage, Invite a friend आणि त्यानंतर Help हा पर्याय उपलब्ध होता. तसेच अकाऊंट (Accounts) पर्यायामध्ये Privacy, Security, Two-Step verification, change number असे पर्याय होते. परंतु आता यात थोडा बदल झाला आहे.

new-whatsapp-update

बदलानंतर आता चॅट्स (Chats) या पर्यायाच्या खाली Wallpaper, Chat Backup, Chat History हे पर्याय आणि हेल्प (Help) या पर्यायाच्या खाली FAQ, Contact Us, Terms and Privacy Policy, App Info हे पर्याय आले आहेत. तसेच ग्राहक आपल्या प्रोफाईलवर गेला की त्याला Name, About आणि Phone हे पर्याय वेगळे दिसत आहेत. व्हॉट्सअॅपचा हा नवीन बदल अॅड्रॉईड फोनच्या 2.19.45 व्हर्जनमध्ये देण्यात आला आहे.

whatsapp-update

आपली प्रतिक्रिया द्या