व्हॉट्सअॅपवरचे आईस्क्रीम-केक झाले आणखी यमी…

सामना ऑनलाईन । मुंबई

एखाद्याचा वाढदिवस म्हटला की त्याला रात्री १२ पासून व्हॉट्सअॅपवरून केक-पेस्ट्री-आईस्क्रीम किंवा त्यांच्या आवडत्या पदार्थांच्या स्टीकर्सचा मारा केला जातो. मात्र आता हे पदार्थ अधिक ‘यमी..’ झाले आहेत. हो व्हॉट्सअॅप अपटेड झालं असून त्यामध्ये स्माईली आणि इमोजी अधिक उठावदार आणि आकर्षक करण्यात आले आहेत.

whatsapp-smily-n6व्हॉट्सअॅप हा आता जगण्याचा अविभाज्य भागच झालंय असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. आपण आपल्या प्रत्येक गोष्टींचे अपडेट हे स्टेटस आणि डीपीमधून सातत्याने देतच असतो. शब्दांद्वारे व्यक्त होण्यापेक्षा स्माईलीतून हवं तसं व्यक्त होणं प्रत्येकालाच आवडतं. व्हॉट्सअॅप-फेसबुकचे चॅट्स रंगतदार बनवण्याचं काम स्माईली करतात. त्यामुळेच व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या स्माईली आणि इमोजीवर अधिकाधिक प्रयोग करत असल्याचे दिसत आहे.

मानवी भावना दाखवणाऱ्या या वेगवेगळ्या स्माईली प्रथम पिवळ्या रंगात रंगलेल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये त्वचेच्या विविध रंगांचे पर्याय देण्यात आले. मात्र आता वॉट्सअॅपचे नवे व्हर्जन (2.17.364) यामध्ये स्माईली-इमोजी अधिकच उठावदार आणि रंगतदार झालेले पाहायला मिळतात आहेत.

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअप वेळोवेळी आपल्या युझर्ससाठी योग्य ते बदल करत आवश्यक फिचर अॅपमध्ये आणत असते. अशाच प्रकारचे व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्ससाठी स्माईलीमध्ये आकर्षक बदल केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या आधीच्या स्माईलीपेक्षा आताचे स्माईली ही अधिक ठळक आणि उठावदार आहेत. तसेच भावना व्यक्त करणाऱ्या काही स्माईलीमध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहेत. स्माईलींचा आकार हा आधीपेक्षा थोडा मोठा झाला असून ते लाईव्ह असल्याचा फिल सुद्धा येत आहे.

whatsapp-smily-n3

केक, चॉकलेट, आईस्क्रिम यांसारख्या अनेक इमोजी मध्ये बदल करण्यात आला आहे. खाण्याचे पदार्थ अधिक आकर्षक दिसत आहेत. तुम्हाला जर अशाच स्माईलींचा वापर करून आपले चॅट्स अधिक रंगतदार करायचे असतील तर तुम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअॅप अपडेट करून त्याचा आनंद घेऊ शकता.