व्हॉट्सअॅप आणखी मजेशीर, तीन नवीन फिचर्स


सामना प्रतिनिधी । मुंबई

व्हॉट्सअॅप गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन आलंय. यामध्ये प्रायव्हेट रिप्लाय, फोटो व्हिडीयोत स्टिकर्स ऍड करणे, आणि थ्रीडी टच करून स्टेटस पाहणे यांचा समावेश आहे. सध्या हे फिचर आयफोन युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. लवकरच ते ऍण्ड्रॉईड युजर्ससाठी सुरू करण्यात येतील. प्रायव्हेट रिप्लाय फिचरमुळे ग्रुपपैकी कोणत्याही कॉन्टॅक्टला ग्रुप चॅटमधून पर्सनल मॅसेज पाठवता येईल. याशिवाय कोणालाही व्हिडीयो किंवा फोटो पाठवण्याआधी स्टिकर ऍड करता येणे शक्य होईल. स्टेटस प्रिह्यू थ्रीडी टच फिचर हे 2015 मध्येच सुरू करण्यात आलेले आहे, मात्र आता ते अपडेटेड स्वरूपात युजर्ससमोर आले आहे.