‘मी पाहिलेले बाळासाहेब’ ब्लॉग स्पर्धा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने दैनिक सामनाची वेब आवृत्ती saamana.com वर एका ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आजही आपल्यातच आहेत. ते आपल्याला सोडून गेलेले नाहीत. त्यांच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या आठवणी लिखित स्वरूपात सर्व वाचकांसमोर याव्यात यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

या ब्लॉग स्पर्धेसाठी तुमचे ब्लॉग लिखित स्वरूपात (युनिकोड मंगल फॉण्टमध्ये टाइप केलेले) आम्हाला पाठवणे अपेक्षित आहे. तुमचे ब्लॉग तुमच्या संग्रही असलेल्या बाळासाहेबांच्या छायाचित्रांसह (सक्तीची अट नाही) आणि ब्लॉग लेखकाच्या छायाचित्रासह पाठवावेत. ब्लॉग लिहिणाऱयाने ब्लॉगमध्ये स्वतःचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता लिहून पाठवावा. ब्लॉग स्पर्धेच्या विजेत्यांची नावे २३ जानेवारीला घोषित करण्यात येतील. पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

ब्लॉग स्पर्धेसाठीच्या अटी आणि शर्ती

 • ब्लॉग मराठीतच आणि युनिकोड फॉन्टमध्ये लिहिलेला हवा.
 • ब्लॉगच्या शब्दांची मर्यादा : ३०० शब्द
 • १८ वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
 • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी [email protected] या ई-मेल अॅड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा.
 • ई-मेल अॅड्रेस देणं अनिवार्य आहे.
 • या स्पर्धेसाठी कोणतंही शुल्क नाही.
 • एकावेळी एका व्यक्तीला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
 • ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख शुक्रवार १९ जानेवारी २०१८
 • मुदतीनंतर पाठवण्यात आलेले ब्लॉग ग्राह्य धरण्यात येणार नाहीत
 • स्पर्धेचा निकाल २३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येईल, ब्लॉग स्पर्धेच्या विजेत्यांनाच फक्त ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
 • बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाची तारीखही विजेत्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल
 • स्पर्धेचं आयोजन, नियमावली, अटी, बक्षिसे या संदर्भात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार ‘सामना’कडे असतील.
 • ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही ब्लॉग पाठवणाऱ्याची जबाबदारी आहे. तुमच्या ब्लॉगद्वारे बौद्धिक संपदा अधिकार, कॉपीराईट कायदा यांचा भंग झाल्यास, उचलेगिरी आढळल्यास त्या व्यक्तीचा स्पर्धेतला सहभाग व पारितोषिक मिळाल्यास तेही रद्द करण्यात येईल.
 • सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, ‘सामना’ हे बांधील नसतील. तुमच्या एन्ट्रीज या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.