पाक महिलेने विचारलं कोण आहे विराट कोहली? चाहत्याने दिलं शानदार उत्तर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने क्रिकेटमधील सर्व गुरुंचे आभार मानले. फोटोच्या बॅकग्राऊंडला अनेक महान क्रिकेटपटूंची नावे लिहिण्यात आली होती. या यादीत पाकिस्तानचे तीन महान खेळाडू इम्रान खान, जावेद मियांदाद आणि इंझमाम उल हक यांचाही समावेश होता.

फोटोमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावं पाहून पाक चाहत्यांना फार आनंद झाला. अनेक चाहत्यांना विराटची खूप स्तुती केली. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार असला, तरी पाकिस्तानातही विराटला फॉलो करणारे चाहते आहेत. याचंच एक उदाहरण हे दोन चाहत्यांमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान दिसून आले.

विराटच्या ट्विट नंतर पाकिस्तानातील एका चाहत्याने ट्विट केले की, “जर कोणाला वाईट वाटणार नसेल तर मला सांगा की हा माणूस कोण आहे?” यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याने ट्विट केले की, “हा विराट कोहली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, कोहली सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहेत आणि त्याच्यामागे जगातील सर्व महान खेळाडूंची नाव आहे.” या ट्विटची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असून विराटची स्तूती केली जातं आहे.