Video- किरण मोरेंनी मारली सचिन तेंडुलकरला लाथ!

सामना ऑनलाईन । मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेटच्या देवाचा दर्जा दिला आहे. सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, मात्र चाहत्यांच्या ह्रदयातील सचिनचं स्थान आजही कायम आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल याच सचिन तेंडुलकरला एका खेळाडूने भर मैदानात लाथ मारली होती. विशेष म्हणजे कुठल्या विरोधी संघाच्या खेळाडूने नाही तर हिंदुस्थानी खेळाडूनेच सचिनला लाथ मारली होती. सचिन तेंडुलकरनं त्यावेळी नुकतच संघात पदार्पण केलं होतं.

सचिनला लाथ मारणारा खेळाडू होते हिंदुस्थानच्या टीममधील तत्कालीन विकेट किपर किरण मोरे. मोहम्मद अझरुद्दीन त्या सामन्यात संघाचा कर्णधार होता. सामन्यादरम्यान विरोधी संघाची विकेट घेतल्यानंतर सर्व हिंदुस्थानी खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी मैदानात एकत्र आले होते. किरण मोरे आणि सचिनही तेथे उपस्थित होते. त्यावेळी अचानक किरण मोरेंनी सचिनला लाथ मारली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहे. मात्र हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या सामन्यामधील आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी याच व्हिडीओवरून सोशल मीडिया युजर्सनी किरण मोरेंना टार्गेट केले होते. चिनला लाथ मारल्याबद्दल अनेकांनी त्यांना जाब विचारला. अनेक क्रिकेटर्स मैदानात आपला आनंद साजरा करण्यासाठी डान्स करतात, टी-शर्ट काढतात, एकमेकांना टाळ्या देतात मात्र लाथ मारण्याचा हा बहुधा पहिलाच प्रकार असावा. मात्र या घटनेबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र क्रिकेटच्या देवाला लाथ मारल्याबद्दल सचिनच्या चाहत्यांचा नक्कीच संताप झाला असणार हे नक्की.