नखं कधी कापाल?

> नोकरदारवर्गासाठी रविवार हा बहुतांश सुट्टीचा दिवस… सुट्टीच्या दिवशी आठवडय़ाभराची कामे केली जातात. पार्लर वगैरेचे कामही त्याच दिवशी करण्यासाठी वेळ असतो. पण रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे. या दिवशी केस आणि नखं कापू नयेत, ती या दिवशी कापल्यास अनेक अडथळे येतात असं म्हटलं जातं.

> केस आणि नखं वाढल्यावर ती कापली जातात. पण ती केव्हा कापायची हे माहीत असले पाहिजे. अनेकदा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखं आणि केस कापू नयेत असं बोललं जातं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार सोमवार व रविवारी केस, नखं कापत नाहीत. त्याव्यतिरिक्त दिवशी केस आणि नखं कापल्यावर आयुष्यात सुख समृद्धी येईल.

> ज्योतिषशास्त्र्ाानुसार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नखं आणि केस कापल्यावर घरात भरभराट होते. तिजोरीमध्ये ठेवलेले धन स्थिर राहते. डोकं शांत राखायचं असेल तर सोमवारी केस आणि नखं कापू नयेत.मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस कापले तर त्या किरणांचा थेट परिणाम मेंदूवर होतो.