‘अजिंक्य रहाणे’ का ‘करूण नायर’ निवड समितीपुढे अवघड पेच

सामना ऑनलाईन। मुंबई

इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये हिंदुस्थानी संघाने ४-० असं निर्भेळ यश मिळवलं. या यशामुळे विराट कोहळीचं नेतृत्व आणि संघातील क्रिकेटपटू यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होताय. मात्र असं असताना निवड समितीपुढे पेच निर्माण झालाय की यापुढील सामन्यांसाठी अजिंक्य रहाणेला संधी द्यायची का करूण नायरला

ajinkya

पुढचा कसोटी सामना हा आता थेट फेब्रुवारी २०१७मध्ये होणार आहे. बांग्लादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवड होणार आहे. यासाठी अजून बराच वेळ असला तरी मधल्या फळीत ५ व्या क्रमांकासाठी कोणाला निवडायचं ही एक मोठी समस्या बनणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडू उत्तम कामगिरी करतोय. त्यामुळे ही समस्या अजून मोठी बनणार आहे.

रहाणेला झालेल्या दुखापतीमुळे करूण नायरला संधी देण्यात आली. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत इंग्लंडसारख्या संघाविरूद्ध त्रिशतक ठोकलं. साहजिकच आहे त्याने निवड समितीपुढे आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा देखील खोऱ्याने धावा करतो. फक्त हिंदुस्थानातच नाही तर देशाबाहेरही त्यांने उत्तम कामगिरी केली आहे.

karun-nair-new

यष्टीरक्षक पार्थिव पटेलही चांगला खेळतोय, जयंत यादव गोवंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. अश्विन, जाडेजा हे देखील अष्टपैलू म्हणून नावारूपास येतायत. अशा परिस्थितीत संघ निवड करणं अत्यंत कठीण जाणार आहे. अशी परिस्थिती फार कमी वेळा निर्माण होते असं अनेक माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. एका खेळाडूवर सगळी भिस्त असण्यापेक्षा अनेक खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे, मात्र निवडसमितीच्या डोक्याला मात्र ताप होणार हे नक्की