पहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारे फक्त 5 खेळाडू, वाचा सविस्तर…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कसोटी हा क्रिकेटचा आत्मा समजला जातो. जो खेळाडू यात दमदार खेळ करू शतको तो दीर्घकाळ मैदानावर खेळताना दिसतो असे म्हटले जाते. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना एकदा तरी तीन आकडी संख्या गाठावी. काही खेळाडू सातत्याने हा आकडा गाठतात तर काहींची कारकीर्द संपते तरी हा आकडा गाठण्यात त्यांना अपयश येते. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या आणि अखेरच्या कसोटीतही शतक ठोकून पदार्पण आणि अखेर दमदार करण्याची संधी खूप कमी खेळाडूंना मिळाली आहे. कोण आहेत असे खेळाडू ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक झळकावले आहे.

अॅलिस्टर कुक (alastair cook) –

alastair-cook
इंग्लंडचा सलामीवर कुक याने आपल्या पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. कुकने हे दोन्ही शतकं हिंदुस्थानविरुद्ध ठोकली. पदार्पणाच्या कसोटीत कुकने नाबाद 106 धावा (वर्ष – 2006) केल्या होत्या, तर अखेरच्या कसोटीत 147 धावा (वर्ष – 2018) केल्या. विशेष म्हणजे कुकने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक आणि शतक व अखेरच्या कसोटीत अर्धशतक आणि शतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) –

azruddin
हिंदुस्थानचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचे नाव याने आपल्या पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीमध्ये शतक झळकावले होते. पदार्पणाच्या सामन्यात अझरुद्दीनने पहिल्या डावात 110 धावांची खेळी (वर्ष -1984) केली होती, तर दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच अखेरच्या सामन्यात पहिल्या डावात 9 आणि दुसऱ्या डावात 102 धावांची खेळी (वर्ष – 2000) साकारली होती. अझरुद्दीनने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 99 कसोटी सामने खेळले यात त्याने 147 डावात फलंदाजी करताना 45.04 च्या सरासरीने 22 शतकांच्या सहाय्याने 6215 धावा ठोकल्या. 199 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

ग्रेग चॅपेल (Greg Chappell) –

chappel
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी देखील आपल्या पदार्पणाच्या आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावले आहे. पदार्पणात चॅपेल यांनी 108 (वर्ष – 1970) आणि अखेरच्या सामन्यात 182 धावांची खेळी (वर्ष – 1984) केली होती. चॅपेल यांनी आपल्या कारकीर्दीत 87 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 7110 धावा ठोकल्या. यात त्यांच्या 24 शतकांचा समावेश आहे. नाबाद 247 ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

विलियम पोन्सफोर्ड (William Ponsford) –

bill-ponsford
रेग्गी यांच्याप्रमाणेच विलिमय या ऑस्ट्रेलियन खेळाडूची कारकीर्द देखील छोटी राहिली. परंतु त्यांनी आपले पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात 110 (1924) आणि अखेरच्या कसोटीत पहिल्या डावात 266 धावा (वर्ष – 1934) करत आपले नाव इतिहासात कोरले. विलियम यांच्या वाट्याला 29 कसोटी सामने आले. यात त्यांनी 48.23 च्या सरासरीने 7 शतकांसह 2122 धावा केल्या.

रेग्गी डफ (Reggie Duff) –

reggie-duff
पहिल्या दोन्ही खेळाडूंपेक्षा यांची कारकीर्द छोटी होती. यांचे नावे देखील आज कोणाला आठवत नाही. परंतु पदार्पणात आणि अखेरच्या सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रेग्गी यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी पदार्पणाच्या कसोटीत दुसऱ्या डावात 104 (वर्ष – 1902) आणि अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात 146 धावा (1905) केल्या होत्या. आपल्या छोट्या कारकीर्दीत त्यांनी 22 सामने खेळले. यात त्यांनी 1317 धावा केल्या.