राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी ही मुलगी कोण आहे ?

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर असून एका रोड शो दरम्यान त्यांची नजर एका मुलीकडे गेली. या मुलीने त्यांना सेल्फी काढण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी ताबडतोब तिची इच्छा मान्य करत प्रचार रथावर तिला ओढून घेतलं.  राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी ही मुलगी कोण असा प्रश्न देशातल्या अनेकांना पडला होता.

mantasha-shaikh-3

ज्या मुलीने राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढला आहे तिचं नाव मंताशा शेख असं असून ती दहावीत शिकते आहे.  राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढता येतो का हे बघण्यासाठी तिने शाळेला चक्क दांडी मारली होती. राहुल गांधी यांनी तिचा हिरमोड केला नाही, आणि तिला सेल्फी काढू दिले.

mantasha-shaikh-1

सेल्फीसाठी मंताशा राहुल यांच्या ताफ्यामागोमाग फिरत होती. भरूच रेल्वे स्टेशनजवळ राहुल गांधींनी तिला बघितलं. थोड्या अंतरावर तिने राहुल यांना पुष्पगुच्छ दिला. शीतल गेस्ट हाऊसजवळ या मुलीने राहुल यांना सेल्फीसाठी विनंती केली. ही विनंती स्वीकार करत राहुल गांधी यांनी तिला प्रचार रथावर ओढून घेतलं.

mantasha-shaikh-2

दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी मंताशा हुशार विद्यार्थिनी आहे. तिची पायलट बनण्याची इच्छा असून राहुल गांधी तिचे आवडते नेते आहेत. तिचे वडील इब्राहीम हे इंदिरा गांधींचे प्रशंसक होते