संजय जाधव यांच्या ‘लकी’मध्ये दिसणार हे कलाकार?

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. याचं मुख्य कारण आहे, मी लकी आहे असं म्हणणारे मराठीतले लोकप्रिय चेहरे.

‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला झळकणार आहे. लकीची घोषणा 2 जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेले एक महिना प्रॉडक्शन हाऊसकडून कलाकारांची यादी काही जाहीर झाली नव्हती.

फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनुसार, लकीने फिल्म इंडस्ट्रीसह सिनेरसिकांचीही गेले एक महिना एवढी उत्सुकता ताणून धरली होती. असे फक्त बॉलीवूड सिनेमांबाबतच होते. गेला एक महिना या सिनेमात नक्की कोण कोण असेल? ह्याविषयी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती. आणि मग अचानक सोशल मीडियावर एकामागून एक लोकप्रिय कलाकारांच्या पोस्ट पाहायला मिळाल्या.

आधी उमेश कामत, मग सिद्धार्थ जाधव, त्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा आघाडीच्या मराठी कलाकारांनी तेच ‘लकी’ असल्याचं म्हटलं आहे. पण, नक्की यातले कोण लकी असतील त्याची घोषणा ‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ लवकरच 7 सप्टेंबरला करणार आहे. पण तोपर्यंत ह्या बिगबजेट आणि मोस्ट अवेटेड सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अजून कोण कोण सामिल होते आहे. ते सोशल मीडियावरून कळेलच.