मुलांच्या फीसाठी महिलेनी केली वृध्देची हत्या

सामना ऑनलाईन । मुंबई

विरारमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेची रविवारी हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाची योग्यरितीने विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरण्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी एका विधवा महिलेला अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पैशासाठीच ६७ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.

पुष्पा वासंदानी असं या ४९ वर्षीय आरोपी महिलेचं नाव असून कीर्तीनिधी शर्मा असं हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. पुष्पाच्या पतीचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती. रिअल इस्टेटमध्ये दलाल म्हणून ती काम करत होती. मात्र त्यामध्ये फारसे पैसे मिळत नसल्याने ती घराचं भाडं भरण्यास तसेच मुलांच्या शाळेची फी भरण्यासही असमर्थ होती. तसेच ती घर कमी मिळवून देते असं सांगत लोकांना फसवत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

विरारचे पोलिस उपअधीक्षक जयंत बाजबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाने कीर्तीनिधींची हत्या करण्यासाठी तीक्ष्ण हत्याराचा वापर केला आहे. कीर्तीनिधींच्या शरीरावर अनेक जखमा ही झाल्या आहेत. पुष्पावर खून आणि दरोडा प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कीर्तीनिधी शर्मा यांच्याकडे खूप दागिने आणि बँकेचे डेबिट कार्ड असल्याची पुष्पाला माहिती होती. ज्यावेळी पुष्पाच्या घरात कीर्तीनिधींता मृतदेह सापडाला तेव्हा त्यांची सोन्याची चेन, ब्रेसलेट, चार बांगड्या, दोन मोबाईल, एक आयपॅड, एक घड्याळ आणि दोन डेबिट कार्ड या वस्तू गायब होत्या.

रविवारी पुष्पाचा लहान मुलगा खेळायला गेलेला असताना ६ वाजण्याच्या सुमारास कीर्तीनिधींची हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुष्पा यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र पुष्पाने हा मृतदेह आपल्या किचनमध्ये कसा आला हे आपल्यालाच माहीत नसल्याची खोटी माहिती सर्वांना दिली. त्यामुळे पुष्पा राहत असलेल्या इमारतीतील लोकांनी १०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मृतदेह असल्याची पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केल्यानंतर पैशासाठीच कीर्तीनिधींची हत्या केल्याची कबुली पुष्पाने पोलिसांना दिली. कीर्तीनिधी शर्मा विरारमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांची पुष्पासोबत ब्युटी पार्लरमध्ये ओळख झाली होती. विमाच्याच कामासाठी कीर्तीनिधी पुष्पाला भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र तिथून रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने कीर्तीनिधी यांचा मुलगा विकासने अर्नाळा कोस्टल पोलिसांकडे त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.