कुलभूषण जाधव यांची दीड वर्षानंतर कुटुंबियांशी भेट

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज जाधव यांची भेट घेतली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली असून त्यांना या भेटीसाठी केवळ अर्धा तासच देण्यात आला होता. जाधव यांच्या पत्नी आणि आई हिंदुस्थानी उपउच्चायुक्तांसोबत याठिकाणी पोहचल्या आहेत.

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद करण्यात आलं आहे. यानंतर हिंदुस्थानने तत्काळ या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत फाशीला स्थगिती दिलेली आहे.