आंबेडकरांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही, भीम आर्मीची धमकी

168

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास अवघे काही तास बाकी आहेत. उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असतानाच भीम आर्मीने सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाल्यास भाजपचं एकही कार्यालय ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे. तसेच राज्यामध्ये भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही अशीही धमकी भीम आर्मीने दिली आहे. ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, सोलापुरातून जर प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला तर भाजपची सर्व कार्यालयं तोडून टाकू, अशी धमकी भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लढत आहेत. सोलापुरात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे.

तोडफोड नको – प्रकाश आंबेडकर
दरम्यान, उद्या जो पण जो निकाल लागेल तो मान्य करावा लागेल, कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, आंबेडकर समुदायाने निकाल मान्य करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या