न्याय योजनेमुळे हिंदुस्थान गरीबीमुक्त होईल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा विश्वास

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी काँग्रेसची महत्त्वाकांक्षी योजना न्युनतम आय योजना अर्थात ‘न्याय’ची प्रशंसा केली. ही योजना लागू झाल्यानंतर हिंदुस्थान गरीबीमुक्त होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच मध्यम वर्गावर कुठलाच आर्थिक बोझा नाही पडणार असेही ते म्हणाले. एक पत्रक काढून त्यांनी हे मत व्यक्त केले.

सिंह म्हणाले की, “न्याय योजनेमुळे देशातील उरलीसुरली गरीबी संपुष्टात येईल. तसेच यामुळे अर्थव्यवस्थेला गतीही मिळेल.” देशात लोकांनी या योजनेला पसंती दर्शवली आणि देशभरात यावर चर्चा होत आहे यावर सिंह यांनी आनंद व्य्क्त केला. “गेल्या 70 वर्षात गरीबी हटवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्याचा परिणाम गरीबी 70 टक्क्यावरून 20 टक्क्यांवर पोहोचली. आता ही उरलीसुरलीही गरीबी हटवण्याचा आपण संकल्प केला पाहिजे” असेही सिंह यावेळी म्हणाले