सत्तेवर आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, राहुल गांधींची घोषणा


सामना ऑनलाईन । दुबई

जर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला तर आंध्र प्रदेशला आम्ही विशेष राज्याचा दर्जा देऊ अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. गांधी हे दुबईच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात हिंदुस्थानी कामगारांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा त्यांनी केली.

गांधी म्हणाले की, “जर आमचा पक्ष सत्तेत आला तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ” जून २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन त्यातून तेलंगाणा राज्याची निर्मिती केले गेली. गांधी हिंदुस्थानी कामगारांना म्हणाले की, “तुम्ही हिंदुस्थान, हिंदुस्थानी राज्य आणि गरीब लोकांची मदत केली. तसेच तुम्ही दुबई शहराच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. यासाठी मी तुमचे आभार मानतो.

संयुक्त अरब अमीरात मधील विकासाची प्रशंसा करतना गांधी म्हणाले की, “आज आपण दुबईत मोठ मोठ्या इमारती पाहतो, मोठ मोठी विमातळं, मेट्रो हे तुमच्या योगदानाशिवाय शक्य नव्हते. तुम्ही या शहराच्या विकासासाठी रक्त आणि घाम दिले. तुम्ही सगळ्यांनी हिंदुस्थानच्या नावाचा गौरव केला आहे.”