विंटरमधला हटके लुक

सामना ऑनलाईन । मुंबई

मुलांची फॅशन मर्यादित असते, असा आपल्याकडे गैरसमज आहे. पण हा ट्रेंड आता बदलला असून आजकाल थंडीच्या दिवसातही मुलांच्या वस्तू फॅशनेबल रुपामध्ये आपल्यासमोर येत आहेत.

१. ओव्हर कोट
हा कोट घातल्यानंतर अगदी राजेशाही थाट केल्यासारखा भास होतो. ओव्हर कोटची सध्या बाजारात चांगलीच चलती असून त्यात काळा, राखाडी रंग चांगले दिसतात.

winter-1

२. लेदर जॅकेट
जिन्सवर आजकाल सर्रासपणे लेदर जॅकेट वापरले जाते. लेदर जॅकेटमध्ये खास रंगसंगती व डिझाईनही आहेत. हे जॅकेट घातल्यानंतर तुम्हाला नक्कीच हटके लूक मिळू शकतो.

winter-2

३. ट्राऊजर
तुमच्या रोजच्या वापरातील ट्राऊजरही तुम्ही या हिवाळ्यात वापरू शकता. यात राखाडी रंगाच्या ट्राऊजरची जास्त चलती असून त्यासोबत तुम्ही लेदर जॅकेट किंवा टी-शर्ट सोबत चांगले दिसाल.

winter-3

४. श्रग
श्रगचा वापर फॅशनेबल जॅकेट म्हणून केला जात असला तरी तो थंडीच्या दिवसात आपले नक्कीच सरंक्षण करतो. श्रग हे कोणत्याही कपड्यांवर मॅच होत असल्याने त्याचा वापर थंडीच्या दिवसात अगदी सर्रास केला जातो.

winter4

५. टोपी
कानाला गार हवा न लागण्यासाठी कानटोपी बऱ्याच हटके प्रकारात बाजारात दिसू लागली आहे. यात मुलांसाठी बंडी कॅप, देव आनंद स्टाईल कॅप, ब्रिटीश कॅप यांसह वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.

winter-5

६. स्कार्फ
स्कार्फ म्हटल की बरीच मुलं नाक मुरडतात. पण स्कार्फमध्येही आता बऱ्याच डिझाईन आल्या असून त्यात विविध रंगसंगतीही उपलब्ध आहे.

winter-6

७. बुट
हिवाळ्यात गमबुटप्रमाणे दिसणारे बुट्सही तुम्ही वापरू शकता. सध्या काळा, ब्राउन या रंगाला जास्त चलती असून त्यात वेगवेगळे डिझाईनही उपलब्ध आहेत.

winter-7

८. गॉगल्स
थंडीमध्ये त्वचेसोबत डोळ्यांची काळजी घेणेही फार गरजेचे असते. गॉगस्ल फॅशनमध्येही नवनवीन डिझाईनची भर पडत चालली आहे. त्यातच गोलाकार, चौकोनी, अंडाकृती गॉगल्सचा ट्रेंड सध्या बघायला मिळतोय.

winter-8