वीज वाहिनीला चिकटून कामगाराचा मृत्यू


सामना प्रतिनिधी । जामखेड़

अंबड तालुक्यातील जामखेड येथे नवीन रोहित्र बसविण्याचे काम सुरु असताना वरच्या तारेला चिटकल्याने तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. शहादेव धोंडीराम राठोड (20) असे मृत कामगाराचे नाव आहे

जामखेड व परिसरात विजेचे नवीन कामे मोठ्या प्रमाणात चालू आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या दरम्यान पोलीस चौकी समोरच रोडच्या कडेला नवीन रोहित्र बसवून खांबावर तारा जोडण्यासाठी कामगार शहादे राठोड हा पोलवर चढला असता त्याच पोलच्या वरच्या बाजुस असलेल्या विद्युत वाहिनीस त्याचे डोके लागले आणि मोठा आवाज होऊन तो चिकटला गेला. काही वेळानंतर तो खाली कोसळला. आजु-बाजुच्या लोकांनी आरडाओरड केली. जवळच पोली चौकी असल्याने पोलीसही लगेच हजर झाले. व प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तो मयत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रेत शवविच्छेदनासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळाले.