बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना पकडले, बायकोने छाटले नवऱ्याचे लिंग


सामना ऑनलाईन । वेल्लोर

पतीने बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना पकडले म्हणून एका पत्नीने चक्क त्याच्या लिंगाचा जोरदार चावा घेत त्याचे दोन तुकडे केल्याची घटना आंध्रप्रदेशमधील वेल्लोर जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली असून तिच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जयंती (५०) असे त्या महिलेचे नाव आहे.

जयंती ही तिचा पती सेंथमाराई (५५) याच्यासोबत वेल्लोर जिल्ह्यातील गुडीयाथम गावात राहायची. त्यांना दोन मुलगे असून ते कामानिमित्त हैदराबाद येथे राहतात. बुधवारी जयंती व तिचा नवरा आदी महोत्सवासाठी गावच्या जत्रेला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते जत्रेतील रात्रीचे नाटक बघण्यासाठी थांबले. रात्री दीडच्या सुमारास नाटक सुरू असताना जयंती पाणी पिण्याच्या बहाण्याने तेथून उठून गेली. जवळपास तासभर झाला तरी जयंती परत न आल्याने सेंथमाराई तिला शोधण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला जयंती तिचा प्रियकरासोबत धातचनामूर्ती सोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळली. त्यावेळी रागाच्या भरात सेंथमराईने जयंतीला मारहाण करायला सुरुवात केली व त्यांचे अनैतिक संबंध गावकऱ्यांना सांगणार असल्याचे सांगितले. त्यावेळी जयंती व धातचनामुर्ती यांनी तेथून पळून जायचा प्रयत्न केला मात्र सेंथमाराईने तिला पकडून ठेवले होते.त्यावेळी झालेल्या खेचाखेचीमध्ये सेंथमाराईची लुंगी सुटली. त्यानंतर जयंतीने सेंथमाराईच्या लिंगाचा चावा घेत त्याचे दोन तुकडे केले व तेथून पळून गेली. सेंथमाराईचा आरडा ओरड ऐकून गावकरी तेथे जमा झाले. त्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी पोलिसांनी जयंतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जयंती फरार असल्याने पोलिसांनी धातचनामूर्ती याचा मोबाईल ट्रेस करत त्या दोघांना ताब्यात घेतले. मात्र धातचनामूर्तीची चौकशी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली असून जयंतीला अटक करण्यात आली आहे.