ती स्वतःच बनली ‘पोलीस’ 17 दिवसांनी पकडले भामटय़ाला

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन,मुंबई

मदतीचा बहाणा करून महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या भामटय़ाला अखेर महिलेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भूपेंद्र मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. वडाळा येथे राहणारी महिला रेहाना शेख ही वांद्रे येथे कामाला आहे. गेल्या 18 डिसेंबरला ती वांद्रे येथील एका एटीएममध्ये  पैसे काढण्याकरिता गेली होती. कार्ड स्वाइप केल्यानंतर एटीएममधून पैसे येत नव्हते. त्या बराच वेळ एटीएममध्ये होत्या. तेव्हा बाहेर थांबलेला मिश्रा मदतीचा बहाणा करून एटीएममध्ये शिरला आणि त्याने तेच्या बँक खात्याचा तपशील घेतला. पण पैसे न आल्यामुळे रेहाना निघून गेल्या. संध्याकाळी मोबाईलवर 10 हजार काढल्याचा मेसेज आल्यावर त्या एटीएममध्ये पुन्हा गेल्या. तेथे मिश्रा नव्हता. रेहाना या गेल्या 17 दिवस त्या एटीएमजवळ पाळत ठेवून होत्या. 4 जानेवारीला मिश्रा त्या एटीएमजवळ दिसला. रेहानाने याची माहिती वांद्रे पोलिसांना कळवली. त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली.