सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यास नकार देणाऱ्या महिलेस सासरच्यांनी जाळून मारले

2
fire-symbolic

सामना ऑनलाईन । कोलकाता

बंगालमधल्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. येथील एका महिलेला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने सासरच्यांनीच जिवंत जाळण्यात आले आहे. या पीडित महिलेची सासू सेक्स रॅकेट चालवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार पीडित महिलेचे अवघ्या सहा महिन्यापूर्वी पश्चिम मिदानपूर जिल्ह्यातल्या पोरालदा गावामध्ये लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरु होते. पण लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी पीडित महिलेची सासू तिला परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवण्यास बळजबरी करु लागली. पीडित महिला याला सातत्याने विरोध करत असल्याने दोघांमधील संबंध ताणले गेले होते.

पीडित महिलेची सासू आणि नवऱ्याने अखेर १२ मार्चला रॉकेल टाकून तिला जाळून टाकले. या महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या महिलेने ही आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. यामध्ये ती महिला ८० टक्के भाजली होती. रुग्णालयामध्ये उपचार घेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पीडित महिलेच्या सासरची सर्व मंडळी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.